रायरंद चित्रपटाला नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 13:26 IST2017-02-26T07:56:03+5:302017-02-26T13:26:03+5:30

 रमेश ननावरे दिग्दर्शित रायरंद या चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच अनेक ...

Honor in the National Film Festival of the Ryder film at the Noida International Film Festival | रायरंद चित्रपटाला नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बहुमान

रायरंद चित्रपटाला नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बहुमान

 
मेश ननावरे दिग्दर्शित रायरंद या चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये यश मिळविले आहे. आता हेच पाहा ना, नोएडा येथे संप्पन झालेल्या ४ था नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रायरंद चित्रपटाला विशेष एक्सलन्स पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे खास स्क्रीनिंगही नोएडा येथे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. चित्रपटाला नोएडा रसिकांची प्रचंड दाद मिळाली.
           
             रायरंद या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण नगर जिल्हयात झाले असून जिल्ह्यातील अनेक कलावंतांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. रायरंद या चित्रपटात बहुरूपी व बालमजुरी यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटात एका लोककलावंत बहुरूपी माणसाची गोष्ट मांडण्यात आलेली आहे. श्रीरामपूरचे कलावंत श्यामकुमार श्रीवास्तव यांनी मुख्य रायरंदची भूमिका साकारली आहे. अभिनेता आनंद वाघ यांनी या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारली आहे. तसेच आशिष निनगुरकर यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून गीतलेखन भावेश लोंढे व आशिष निनगुरकर यांचे आहे.
     
               न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अनंत जोग, रणजित कांबळे,श्यामकुमार श्रीवास्तव, आशिष निनगुरकर, करण कदम, आनंद वाघ, अजित पवार, प्रवीण भाबळ, सुनील जैन, सुरेश दाभाडे, रेखा निर्मळ, गोरख पठारे, झाकीर खान, राजू ईश्वरकट्टी, नाना शिंदे, संतोष चोरडीया, स्वप्नील निंबाळकर, फिरोज खान, सुभाष कदम व अनुराग निनगुरकर आदि कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. 

Web Title: Honor in the National Film Festival of the Ryder film at the Noida International Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.