हिंदी सिनेमांची मक्तेदारी जिंकली, मराठी सिनेमा हरला!

By संजय घावरे | Published: May 11, 2023 03:33 PM2023-05-11T15:33:49+5:302023-05-11T15:34:34+5:30

Marathi movie: रस्त्यावर उतरून 'तेंडल्या' वाटतोय पॅम्लेट; पुर्नप्रदर्शनासाठी 'टीडीएम'ने कसली कंबर

Hindi bollywood movies won and the Marathi movies lost | हिंदी सिनेमांची मक्तेदारी जिंकली, मराठी सिनेमा हरला!

हिंदी सिनेमांची मक्तेदारी जिंकली, मराठी सिनेमा हरला!

googlenewsNext

मागच्या आठवड्यात रिलीज झालेल्या 'तेंडल्या' आणि 'टीडीएम' या मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळवण्यासाठी वणवण करावी लागत आहे. हिंदी चित्रपटांमुळे शोज मिळत नसल्याने सिनेमागृहांतून 'टीडीएम' उतरवण्यात आला असून, 'तेंडल्या'ची आणखी शोज मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा मल्टिप्लेक्समधील हिंदी चित्रपटांची मक्तेदारी जिंकली असून, मराठी चित्रपट हरल्याची भावना मराठी सिनेसृष्टीतून व्यक्त केली जात आहे.

मराठी चित्रपटांना प्राईम शोज मिळत नाहीत अशी ओरड कायम असायची, पण कोणतेही शो मिळत नसल्याचे चित्रही वारंवार पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना मिळणारी ही वागणूक सुरेश भटांच्या कवितेतील 'पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी...' या ओळीतील वास्तव दर्शवणारे आहे. 'ख्वाडा' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या भाऊराव कऱ्हाडेने 'टीडीएम'चे दिग्दर्शन केले आहे, तर एफटीआयमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या नवोदित नचिकेत वाईकरने 'तेंडल्या'चे दिग्दर्शन केले आहे. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा कौल मिळाला असला तरी शोज नसल्याने उर्वरीत प्रेक्षकांपर्यंत हे चित्रपट पोहोचू शकलेले नाहीत. 

७० शोजसह संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झालेल्या 'तेंडल्या'चे मुंबईत केवळ दोन शोज आहेत. निर्मात्यांनी कर्जबाजारी होऊन जवळपास पावणे दोन कोटी रुपये खर्चून हा चित्रपट बनवला आहे. प्रमोशनसाठी आणखी पैसे नसल्याने 'तेंडल्या'चा दिग्दर्शक नचिकेतसह संपूर्ण टीम रस्त्यावर उतरून पत्रके वाटून प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

'टीडीएम' संपूर्ण महाराष्ट्रात १०० हून अधिक शोजसह रिलीज झाला होता. मुंबईत चार-पाच शोज होते, पण रिलीज झाल्यावर पहिल्याच दिवशी शोज कमी मिळाल्याने अश्रू ढाळणाऱ्या भाऊरावने दुसऱ्या दिवशी स्वत:च सर्व सिनेमागृहांमधून चित्रपट उतरवला. २६ मे रोजी किंवा त्या पुढील आठवड्यात नव्या जोमाने 'टीडीएम' प्रदर्शित करणार असल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. 
 

- नचिकेत वाईकर (दिग्दर्शक, तेंडल्या)

पुण्यामध्ये काही शोज हाऊसफुल आहेत. 'तेंडल्या' पाहिलेले प्रेक्षक इतरांना सांगत आहेत. या चित्रपटाला एक राष्ट्रीय आणि पाच राज्य पुरस्कार मिळाले असूनही कोणी आमच्या पाठीशी उभे न राहिल्याने निर्माता व सहदिग्दर्शक सचिन जाधव यांनी कर्ज काढून सिनेमा बनवला व रिलीज केला. तो देखील प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचू न शकल्याचे दु:ख आहे. मागील दीड महिन्यांपासून सिनेमा रिलीज करण्यासाठी खूप संघर्ष केला आहे.

- भाऊराव कऱ्हाडे (दिग्दर्शक, टीडीएम)

सर्वच पक्ष-संघटनांनी 'टीडीएम'ला पाठिंबा दर्शवल्याने पुन्हा नव्या जोमात रिलीज करण्यासाठी हुरूप आला आहे. यासाठी नवीन वितरक नेमणार आहे. या सर्व गदारोळामुळे सिनेमाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. चित्रपट रिलीजपूर्वी मी डिसीपी फायनल करण्याच्या गडबडीत होतो. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मुलाखतींसाठी जाता आले नाही. प्रमोशन आणि वितरण नीट न झाल्याने आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये मुलाखती व रिव्ह्यूज येऊ न शकल्याचीही खंत आहे.
 

Web Title: Hindi bollywood movies won and the Marathi movies lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.