झाला बोभाटा चित्रपटाच्या प्रमोशनचा हटका फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 12:35 IST2016-12-27T12:35:53+5:302016-12-27T12:35:53+5:30

बॉलिवुडप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीत आगामी चित्रपटांचे प्रमोशन जोरदार सुरू असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर, हे प्रमोशन फंड हटते ...

Hilla Bobhata Movie Promotion Fund | झाला बोभाटा चित्रपटाच्या प्रमोशनचा हटका फंडा

झाला बोभाटा चित्रपटाच्या प्रमोशनचा हटका फंडा

लिवुडप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीत आगामी चित्रपटांचे प्रमोशन जोरदार सुरू असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर, हे प्रमोशन फंड हटते पध्दतीने चालू असल्याचे दिसत आहेत. मध्यंतरी फुगे या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्ट्रीतील कलाकारांनी फुगे हातात घेऊन मस्ती घालतानाचा प्रत्येक कलाकाराचा व्हिडीओ सोशलमीडियावर पाहायला मिळाला. आता झाला बोभाटा या चित्रपटाचा प्रमोशन फंडादेखील सोशलमीडियावर एकदमच हटके पाहायला मिळत आहे. झाला बोभाटा या चित्रपटाच्या फेसबुक पेजवरुन एक हटके पोस्ट शेअर करण्यात आली आहे. चित्रपटातील सहभागी कलाकारांची झलक पाहताना प्रेक्षकांनाही एक नवा अनुभव मिळणार आहे. ३६० अंशांतून या चित्रपटाकील कलाकारांची झलक प्रेक्षकांना पाहता येणार आहे. माऊसचा कर्सर ज्याप्रमाणे तुमच्या स्क्रिनवर फिरेल त्या त्या कोनातून या चित्रपटातील कलाकारांची झलक दिसणार आहे. अनुप जगदाळे दिग्दर्शित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात आभिनेता दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे, कमलेश सावंत, दिपाली आंबिकार, तेजा देवकर, मयूरेश पेम, मोनालिसा बागल, रोहित चव्हाण या कलाकारांचा समावेश आहे. किंग क्रिएशन आणि डीजी टेक्नो इंटरप्राईझेस प्रस्तुत, या चित्रपटाची निर्मिती साईनाथ राजाध्यक्ष आणि महेंद्रनाथ यांनी केली आहे. ६ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच या चित्रपटाचे विशेष म्हणजे झाला बोभाटा हा चित्रपट अजुन प्रदर्शित देखील झाला नाही. तेवढ्यातच या चित्रपटाचा हिंदी रिमेक होणार असल्याचा बोभाटा ऐकु येत आहे. सैराट, पोश्टर बॉय, नटरंग, दे धक्का या चित्रपटांच्या पक्तींतच आता झाला बोभाटा हा चित्रपट देखील सामील होणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी अभिनेता अजय देवगनला घेऊन झाला बोभाटा या मराठी सिनेमाचा रिमेक बनवणार असल्याचे समजतेय. या सिनेमाचा ट्रेलर पाहून रोहित शेट्टी भारावून गेला. त्यानंतर त्याने याचा हिंदी रिमेक बनवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळतेय.







Web Title: Hilla Bobhata Movie Promotion Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.