हेमांगी कवीला हवाय 'झिम्मा ३', इच्छा व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली - "हा खेळ थांबवू नकोस.."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 07:34 PM2023-11-30T19:34:25+5:302023-11-30T19:35:00+5:30

Hemangi Kavi : अभिनेत्री हेमांगी कवी हिने नुकतेच सोशल मीडियावर 'झिम्मा २' चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये झिम्मा ३ चित्रपट हवा असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Hemangi Kavi Wants 'Zimma 3', Actress Says Wishes - "Don't Stop This Game..." | हेमांगी कवीला हवाय 'झिम्मा ३', इच्छा व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली - "हा खेळ थांबवू नकोस.."

हेमांगी कवीला हवाय 'झिम्मा ३', इच्छा व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली - "हा खेळ थांबवू नकोस.."

अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. बऱ्याचदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत येत असतात. नुकतेच तिने सोशल मीडियावर झिम्मा २ चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये झिम्मा ३ चित्रपट हवा असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.  

अभिनेत्री हेमांगी कवी हिने फेसबुकवर झिम्मा २ चित्रपटातील काही फोटो शेअर करत लिहिले की, मला तर बाई लय मंजी लय मज्जा आली! 
हेमंत ढोमे अरे काय कमाल सिनेमा आहे! खरे सांगू तर झिम्मा १ पेक्षा झिम्मा २ जास्त जमून आलाय. कदाचित या बायकंना आम्ही झिम्मा १ पासून ओळखत होतो म्हणून हे मला वाटलं असेल. प्रत्येकीची गोष्ट वेगळी पण तितकीच प्रभावी आणि रिलेटेबल! विचार करायला लावणारी आणि आचरणात आणायला कुठेही कठीन न करता सहजपणे आपल्यात बदल करू शकणारी! खरंच मज्जा आली. प्रचंड enjoy केला मी हा सिनेमा!

तिने पुढे लिहिले की,  निर्मीती सावंत!!!! काय करायचं या बाईचं! म्हणजे मला काही सुचेचना! कसं कसं करतेस गं तू! इतक्या वर्षांपासून कसं गं हे अबाधित ठेवलंयस? आपल्याकडे विशिष्ट वयानंतर अभिनेत्रीला मुख्य किंवा हिरोईन म्हणून बघितलं जात नाही. पटकन चरित्र कलाकार, सहाय्यक कलाकार म्हणून आपण लगेच कॅटेगिरीज करतो. हॉलिवूड किंवा इतर कुठेही असं होत नाही. मोठ्या वयाच्या अभिनेत्रींना लीड म्हणूनच पाहीलं जातं. अवॉर्ड्ससाठी मुख्य श्रेणीत गणलं जातं. ही गोष्ट जर आपल्या इथं सुरू झाली तर त्याला तु कारणीभूत असशील ताई. इतकं भारी काम केलंयस तू! सुहास ताई, हीच गोष्ट ‘तु तिथं मी’ च्या वेळी वाटली होती. आणि आज ही तुमची इंदू पाहून वाटलं! तो line मारायचा scene! मी तर शिट्टीच हाणली theatre मध्ये. क्या बात है! 

रिंकू महादेव राजगुरू दुसरं कौतुक करावंसं वाटतं ते रिंकू राजगुरूचं. खुप समजून- उमजून काम केलंय. टिपिकल सून न करता एकदम छान तान्या साकारली आहे. स्क्रीनवर दिसताच आपसूक आमच्या चेहऱ्यावर स्माइल येत होतं. थोडक्यात या सासू-सूनेने लयच धमाल आणलीए! एक एक सीन चोपलाय तिघींनी! जाता जाता एवढंच सांगेन हेमंत ढोमे आता आम्हांला झिम्मा ३ हवाय. हवाय म्हणजे हवायययययय! ते तू बाकी सिनेमे करत रहा पण झिम्मा युनिव्हर्सला अंत देऊ नकोस! फार फार तर काय होईल एखादा पार्ट फसेल! ठिक आहे की. पण हा खेळ थांबवू नकोस एवढीच विनंती तुझ्या सगळ्या टीमकडे. इरावती कर्णिक, क्षितीज पटवर्धन कमाल कमाल! कमाल!, असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
 

Web Title: Hemangi Kavi Wants 'Zimma 3', Actress Says Wishes - "Don't Stop This Game..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.