"जेव्हा थेट ‘वर्षा’ वरून बोलावणं येतं", मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणाने हेमांगी कवी भारावली, म्हणाली, "बंगल्यात शिरताना भीती होती..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 11:11 AM2023-09-28T11:11:59+5:302023-09-28T11:18:47+5:30

"घरात गणपती आहेत म्हणून मुख्यमंत्री निवांत असतील तर...", हेमांगी कवीला एकनाथ शिंदेंचं कौतुक, म्हणाली...

hemangi kavi took blessing at cm eknath shinde varsha banglow ganpati shared post | "जेव्हा थेट ‘वर्षा’ वरून बोलावणं येतं", मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणाने हेमांगी कवी भारावली, म्हणाली, "बंगल्यात शिरताना भीती होती..."

"जेव्हा थेट ‘वर्षा’ वरून बोलावणं येतं", मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणाने हेमांगी कवी भारावली, म्हणाली, "बंगल्यात शिरताना भीती होती..."

googlenewsNext

दरवर्षाप्रमाणे यंदाही राज्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. दहा दिवस लाडक्या बाप्पाची पूजा केल्यानंतर आज गणरायाला निरोप दिला जाणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यावरही दरवर्षी बाप्पा विरजमान होतात. यावर्षीही मोठ्या जल्लोषात वर्षावर गणरायाचं आगमन करण्यात आलं. बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकारांनीही वर्षा बंगल्यावर जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. 

यंदा मराठी अभिनेत्री हेमांगी कवीलाही वर्षा बंगल्यावरील गणरायाच्या दर्शनाचं आमंत्रण आलं होतं. हेमांगीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. 

हेमांगी कवीची पोस्ट

जेव्हा थेट ‘वर्षा’ वरून बोलावणं येतं!
महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शन आणि आशीर्वादासाठी आमंत्रित करून मान दिल्याबद्दल खरंच खुप खुप आभार. वर्षा बंगल्यात त्यांच्याबरोबर बाप्पाची केलेली आरती हा एक आल्हाददायक अनुभव होता जो कायम स्मरणात राहील!
एवढंच नाही तर सौ.लताताईं, वृषाली वहिनी आणि त्यांची मंडळी अगदी घरच्यांप्रमाणे प्रेमाने आमच्या पाहुणचाराची विचारपूस करत होते. असं वाटलं जणू आपल्या जवळच्या नातेवाईकाकडेच सणाला आलो आहोत! कसलीच औपचारिक्ता नाही. आता Security reasons मुळे काही गोष्टी नाही share करू शकत पण बंगल्यात शिरताना मनात जी भीती किंवा दडपण होतं ते आत गेल्यानंतर एकदम नाहीसं झालं!
मंगेश देसाई तुझ्यामुळे हे शक्य झालं त्याबद्दल तुला अनेक धन्यवाद. यानिमित्ताने कित्येक वर्षांपासून कुतूहलाचा विषय असलेला आणि बाहेरून पाहत आलेलो ‘वर्षा’ आतून पाहण्याची इच्छा पुर्ण झाली!
खरं सांगायचं तर त्या वास्तूबद्दलचं असलेलं आकर्षण पुढच्या अर्ध्या तासात संपून त्यात राहणाऱ्या व्यक्तीवर केवढी मोठ्ठी जबाबदारी आहे या जाणिवेने आदर वाढायला लागतो! घरात गणपती आहेत म्हणून जरा निवांत असतील मुख्यमंत्री तर छे! पाहुण्यामंडळींमधून त्यांच्या नकळत वेळ काढून मध्ये मध्ये आत जाऊन कामकाज करणं, कसल्याशा Files वर त्यांच्या कर्मचाऱ्यांना सह्या देणं एकीकडे चालूच होतं. मी जरा दबकतच माझ्या ओळखीच्या व्यक्तीला विचारलं की गणपतीच्या एवढ्या सगळ्या गडबडीत आणि तेही एवढ्या late कसल्या सह्या चालंल्यात? तर म्हणाला “उद्याच्या सार्वजनिक सुट्टीबद्दल असू शकतं काहीतरी.” मी पुढे म्हटलं “राज्याच्या कारभारासोबत गेल्या दहा दिवसांतला गोतावळा सांभाळायचा, लाखो लोकांना personally भेटायचं, त्यांचं स्वागत करायचं, विचारपुस करायची, बरं तिथं गेलेल्या प्रत्येकाला वाटतं त्यांच्या बरोबर photo हवाच त्यासाठी कुणालाही नाराज न करता, protocols सांभाळत लाखो photos साठी उभं राहयचं. उत्सहाच्या भरात मी पण त्यांना photo साठी विचारल्याचं आठवलं, लाज वाटली आणि त्यांच्याबद्दल वाईटही वाटलं! म्हटलं “अशाने यांना थकायला होत नसेल का?” तर तो म्हणाला “इथं असंच काम चालतं! आपल्या ठाण्यातसुद्धा आधी असंच काम करायचे की! न थांबता, अविरत!”
मी मनात म्हटलं “गणपती बाप्पा यांना एक माणूस म्हणून शक्ती देओ आणि मुख्यमंत्री म्हणून यांच्या हातून महाराष्ट्राचं, आम्हां नागरिकांचं अधिक कल्याण घडो!”
खरंच राजकारण, समाजकारण! सोप्पं नाही गड्या!

 

हेमांदी कवीच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

Web Title: hemangi kavi took blessing at cm eknath shinde varsha banglow ganpati shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.