अॅम्ब्यूलन्सचे येणारे आवाज कमी झालेत म्हणत हेमांगी कवीने शेअर केली सकारात्मक पोस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 14:54 IST2021-04-27T14:53:07+5:302021-04-27T14:54:51+5:30
हेमांगीने एक सकारात्मक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून ती चांगलीच व्हायरल झाली आहे.

अॅम्ब्यूलन्सचे येणारे आवाज कमी झालेत म्हणत हेमांगी कवीने शेअर केली सकारात्मक पोस्ट
मुंबई आणि ठाण्यातील कोरोना रुग्णांची गेल्या काही दिवसांत संख्या कमी झालेली असून अनेक रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात देखील केली आहे. हेमांगी कवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने एक सकारात्मक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून ती चांगलीच व्हायरल झाली आहे.
हेमांगी कवीने पोस्टमध्ये लिहिले आहे की, दर 10 मिनिटांनी अॅम्ब्यूलन्सचे येणारे आवाज कमी झालेत! मुंबईची परिस्थिती सुधारतेय... सकारात्मक! अजून थोडा संयम मंडळी! रुग्णालयं, डॉक्टर, पोलीस, फ्रंटलाईन वकर्स यांना काम करण्यासाठी आणखी शक्ती मिळो...
दर 10 मिनिटांनी ambulance चे येणारे आवाज कमी झालेत! मुंबईची परिस्थिती सुधारतेय सकारात्मक! 😊 अजून थोडा संयम मंडळी!...
Posted by Hemangi Kavi-Dhumal on Monday, April 26, 2021
हेमांगी कवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच तिच्या फॅन्ससोबत संवाद साधत असते.