'वजनदार' अॅनिमेटेड लोगोचे अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 17:42 IST2016-09-21T12:12:26+5:302016-09-21T17:42:26+5:30
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या मोशन पोस्टर, प्रमोशनल साँग असे विविध प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. त्यात आता 'वजनदार' या बहुचर्चित चित्रपटाच्या अॅनिमेटेड लोगोची ...
.jpg)
'वजनदार' अॅनिमेटेड लोगोचे अनावरण
म ाठी चित्रपटसृष्टीत सध्या मोशन पोस्टर, प्रमोशनल साँग असे विविध प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. त्यात आता 'वजनदार' या बहुचर्चित चित्रपटाच्या अॅनिमेटेड लोगोची भर पडली आहे. या चित्रपटाचं फेसबुक पेज आणि अॅनिमेटेड लोगो नुकताच लाँच करण्यात आला.लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांनी वजनदार या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कुंडलकर यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. तर मराठीतल्या ग्लॅमरस आणि स्टार अभिनेत्री सई ताम्हणकर, प्रिया बापट,सिद्धार्थ चांदेकर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. खास या चित्रपटासाठी सई आणि प्रियानं वजन वाढवलं आहे.