'पाहुणा तो नाही, आम्ही आहोत, हे आहे त्याचं घर'; सिद्धार्थ चांदेकरच्या इमारतीच्या आवारात दिसला नवा पाहुणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 17:50 IST2021-06-15T17:49:48+5:302021-06-15T17:50:42+5:30
सिद्धार्थ चांदेकरच्या इमारतीच्या आवारात दिसला नवा पाहुणा. त्याने क्षणाचाही विलंब न लावता तो क्षण कॅमेऱ्यात टिपला.

'पाहुणा तो नाही, आम्ही आहोत, हे आहे त्याचं घर'; सिद्धार्थ चांदेकरच्या इमारतीच्या आवारात दिसला नवा पाहुणा
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. हे दोघे सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहेत आणि ते बऱ्याचदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. बऱ्याचदा ते त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत येत असतात. नुकतेच त्या दोघांनी शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याला कारणही तसेच आहे. सिद्धार्थ चांदेकरच्या इमारतीच्या मागे निसर्गरम्य परिसर आहे आणि तिथे त्यांना बिबट्या वावरताना दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तो क्षण कॅमेऱ्यात टिपला.
सिद्धार्थ चांदेकरने इंस्टाग्रामवर बिबट्याचा फोटो शेअर करत लिहिले की, आमच्या बिल्डिंगच्या मागे आज एक पाहुणा आला होता. बराच वेळ आमच्याकडे टक लावून बघत बसला आणि झुडपात निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर एक जखम दिसली. "तुमच्यामुळे झालंय हे" असं नजरेतून सांगत होता. बिल्डिंग मधले सगळे फोटो काढायला खिडकीत आले. मी पण आलो. तो फक्त स्थिर नजरेनं बघत होता आमच्याकडे. त्याचा नजरेतून कळत होतं स्पष्ट की पाहुणा तो नाही, आम्ही आहोत. हे त्याचं घर आहे.
तर मिताली मयेकरने देखील इंस्टाग्रामवर बिबट्याचा कठड्यावर बसलेला फोटो शेअर करत लिहिले की, पाहुणा कोण? मी? की तुम्ही??
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या बिल्डिंगमागे बिबट्या दिसल्याची ही पहिली वेळ नाही. बऱ्याचदा तिथे रात्रीच्या वेळी बिबट्या फिरताना आढळतात.