शरद तळवलकर यांच्या नातवाला पाहिलंत का? तोदेखील आहे अभिनेता अन् गाजवतोय हॉलिवूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:31 IST2025-05-30T10:30:19+5:302025-05-30T10:31:08+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिवंगत अभिनेते शरद तळवलकर (sharad talwalkar) यांनी त्यांच्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता त्यांचा नातू कपिल तळवलकर (Kapil Talwalkar) सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे.

Have you seen Sharad Talwalkar's grandson? Kapil Talwalkar is also an actor and is making a name for himself in Hollywood | शरद तळवलकर यांच्या नातवाला पाहिलंत का? तोदेखील आहे अभिनेता अन् गाजवतोय हॉलिवूड

शरद तळवलकर यांच्या नातवाला पाहिलंत का? तोदेखील आहे अभिनेता अन् गाजवतोय हॉलिवूड

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिवंगत अभिनेते शरद तळवलकर (sharad talwalkar) यांनी त्यांच्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यांनी 'धूमधडाका', 'अष्टविनायक', 'मुंबईचा जावई', 'लाखाची गोष्ट' अशा सुपरहिट मराठी चित्रपटात काम केले. शरद तळवलकर यांनी २२ ऑगस्ट, २००१ रोजी वयाच्या ८२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना दोन मुले असून ते परदेशात स्थायिक आहेत. त्यांचा एक नातू कपिल तळवलकर (Kapil Talwalkar) सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. 

शरद तळवलकर यांचा नातू कपिल हॉलिवूड अभिनेता आहे. शरद तळवलकर यांना उमेश आणि हेमंत अशी दोन मुले. हेमंत यांनी १९७७-८० च्या काळात रणजी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. पण त्यानंतर त्यांची ही दोन्ही मुलं अमेरिकेत गेली. उमेश तळवलकर यांचा मुलगा कपिल याचा जन्म अमेरिकेतच झाला. कपिलचे आजोबांसोबत छान बॉण्डिंग होते. आपल्यालाही आजोबांप्रमाणे अभिनय क्षेत्रात जायचं हे त्याचं लहानपणीच ठरलं होतं. कपिलने शाळा, कॉलेजमध्ये असताना अमेरिकेत राहून नाटकातून काम करण्यास सुरुवात केली. पुढे युनिव्हर्सिटीमधून त्याने अभिनय आणि संगीताचे शिक्षण घेतले. 


कपिल तळवलकरने संगीतकार, अभिनेता, पटकथाकार, लेखक अशी हॉलिवूडमध्ये ओळख बनवली आहे. 'अमेरिकन प्रिन्सेस' या चित्रपटातून तो हॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाला आहे. झोयास एक्सट्रा ओर्डीनरी, ख्रिसमस चार्म सीरिजच्या चौथ्या सीझनमध्ये तो झळकला आहे. पुढे सेशन १९ या सीरीजमध्ये तो मुख्य भूमिकेत झळकला. कपिलने अभिनेता म्हणून तर ओळख बनवलीच पण काही चित्रपटासाठी त्याने डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केले. कपिल त्याच्या आजोबांसोबतचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करतो. त्याच्या खोलीतही आजोबा शरद तळवलकर यांच्या चित्रपटाचा एक फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला आजी उषा वाटवे यांचा फोटो त्याने लावला आहे. हे दोन्ही फोटो माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत असे तो सांगतो. एक संगीतकार, अभिनेता, लेखक, पटकथाकार अशी कपिलने हॉलिवूडमध्ये ओळख बनवली आहे. हॉलिवूड चित्रपटाचा मुख्य नायक म्हणून त्याच्याकडे आणखी काही नवीन प्रोजेक्ट आहेत. 
 

Web Title: Have you seen Sharad Talwalkar's grandson? Kapil Talwalkar is also an actor and is making a name for himself in Hollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.