तेजस्विनीच्या घायाळ करणा-या अदा तुम्ही पाहिल्या आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2017 17:22 IST2017-04-15T11:52:08+5:302017-04-15T17:22:08+5:30
मराठीतील विविध अभिनेत्री आपल्या भूमिकांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर मोहिनी घालत असतात. ग्लॅमरस अदा, सौंदर्य, अभिनय कौशल्य यामुळे प्रत्येक अभिनेत्रीची ...

तेजस्विनीच्या घायाळ करणा-या अदा तुम्ही पाहिल्या आहेत का?
म ाठीतील विविध अभिनेत्री आपल्या भूमिकांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर मोहिनी घालत असतात. ग्लॅमरस अदा, सौंदर्य, अभिनय कौशल्य यामुळे प्रत्येक अभिनेत्रीची काही ना काही अशी खासियत असते. प्रत्येक अभिनेत्रीची विशेष अशी फॅन फॉलोईंग असते. या अनेक अभिनेत्रींमध्ये मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिचे नाव आवर्जून घ्यावेच लागेल. तेजस्विनीने आजवर विविधरंगी भूमिका सिनेमातून साकारल्या आहेत. बाप रे बाप डोक्याला ताप, साम दाम दंड भेद, वॉन्टेड बायको नंबर वन, चिनू, बर्नी, गुलदस्ता, दोघात तिसरा आता सगळं विसरा अशा विविध सिनेमांमध्ये तेजस्विनीने भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमातील भूमिका आणि तिची अदा रसिकांना भावलीच आहे. इतंकच नाही तर छोट्या पडद्यावरही तेजस्विनीची जादू पाहायला मिळाली. चित्तोड की रानी पद्मिनी का जोहर या मालिकेतही तेजस्विनीची विशेष लक्षवेधी भूमिका होती. तेजस्विनीच्या विविध अंदाजातील खास फोटो तुम्हालाही घायाळ केल्याशिवाय राहणार नाहीत. यांतील प्रत्येक फोटोमध्ये तेजस्विनीचे सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचे दिसून येत आहे.