​तेजश्री प्रधान आणि सुरुची अडारकर यांचा क्रेझीनेस तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2017 11:28 IST2017-07-22T05:58:18+5:302017-07-22T11:28:18+5:30

दोन अभिनेत्री एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी असू शकत नाही असे म्हटले जाते. पण आपल्या मराठी अभिनेत्रींसाठी हे अगदी चुकीचे आहे. ...

Have you seen the craze of Tejashri Pradhan and Swachi Adarakar? | ​तेजश्री प्रधान आणि सुरुची अडारकर यांचा क्रेझीनेस तुम्ही पाहिला का?

​तेजश्री प्रधान आणि सुरुची अडारकर यांचा क्रेझीनेस तुम्ही पाहिला का?

न अभिनेत्री एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी असू शकत नाही असे म्हटले जाते. पण आपल्या मराठी अभिनेत्रींसाठी हे अगदी चुकीचे आहे. मराठी इंडस्ट्रीत अनेक आघाडीच्या अभिनेत्री या एकमेकांच्या खूप चांगल्या फ्रेंड्स आहेत. होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवी या भूमिकेमुळे नावारूपाला आलेली तेजश्री प्रधान आणि का रे दुरावा या मालिकेतील आदिती म्हणजेच सुरुची अडारकर या एकमेकींच्या खूप चांगल्या फ्रेंड्स आहेत.
खरे तर तेजश्री आणि सुरुची यांनी एकमेकांसोबत कधीच एकत्र काम केले नाही. त्या दोघींनी झी मराठी वाहिनीच्या कार्यक्रमात काम केले असल्याने या वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यांना प्रेक्षकांना त्यांना एकत्र पाहायला मिळत असे. पण तेजश्री आणि सुरुची या खऱ्या आयुष्यात खूप चांगल्या मैत्रिणी असून त्या गेल्या काही महिन्यांपासून एकत्रच राहात आहेत. तेजश्री प्रधान नेहमीच त्यांच्या दोघींचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आतादेखील तिने सुरुची आणि तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये त्या दोघी मजा मस्ती करताना दिसत आहेत. या फोटोंमधून त्यांच्या दोघींचा क्रेझीनेस आपल्याला पाहायला मिळत आहे. 
हे फोटो पाहिल्यानंतर सुरुची आणि तेजश्री यांची मैत्री किती घट्ट आहे आणि त्या दोघी मिळून किती मजा-मस्ती करतात हे आपल्याला दिसत आहे. तेजश्रीने पोस्ट केलेले हे फोटो तेजश्री आणि सुरुचीच्या फॅन्सना खूप आवडत आहेत. या फोटोला आतापर्यंत अनेक लाइक्स मिळत असून अनेकांनी या फोटोवर कमेंट केले आहे. 

Also Read : तेजश्री प्रधानचे पहिले प्रेम तुम्हाला माहीत आहे का?

Web Title: Have you seen the craze of Tejashri Pradhan and Swachi Adarakar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.