कधी पाहिलाय का शिवानी रांगोळेचा हटके आणि पारंपरिक लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 14:01 IST2017-05-08T08:31:55+5:302017-05-08T14:01:55+5:30
सिनेइंडस्ट्रीत कलाकारांना वेगवेगळ्या गोष्टी खूप आवडत असल्याचे ते सोशल मीडियावर अपडेट करत असतात. किंवा त्यांच्या आवडी-निवडीचा त्यानी सोशल मीडियावर ...

कधी पाहिलाय का शिवानी रांगोळेचा हटके आणि पारंपरिक लूक
स नेइंडस्ट्रीत कलाकारांना वेगवेगळ्या गोष्टी खूप आवडत असल्याचे ते सोशल मीडियावर अपडेट करत असतात. किंवा त्यांच्या आवडी-निवडीचा त्यानी सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोंमधून अंदाज येतो. असेच एका अभिनेत्रीची आवडीविषयी आम्हाला कळले आहे. होय, ती अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणीही नसून ती आहे. द वन ओन्ली शिवानी रांगोळे तरुणाईमध्ये सध्या अभिनेत्री शिवानी रांगोळे ही चांगलीच लोकप्रिय आहे. मराठी एकांकिका आणि त्यानंतर छोट्या पडद्यावरील मालिकांमधील अभिनयामुळे शिवानी तरुणाईची फेव्हरेट बनली आहे. छोट्या पडद्यावरील बनमस्का मालिकेतील तिच्या भूमिकेचं रसिकांकडून कौतुक होतंय. आपल्या अभिनयानं मनं जिंकणारी शिवानी सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते. तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर नेटिझन्सला चांगलाच भावतोय. यांत तिचा लूक एकदम वेगळा आणि हटके असल्याने तो रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतो आहे. या फोटोत तिनं मेकअप केलेला नाही. मात्र साडी परिधान केलेला तिचा हटके अंदाज तितकाच खास वाटतो आहे. यांत तिनं नथ, मोत्याच्य कुड्या असा अस्सल मराठमोळा आणि पारंपरिक लूक ठेवला आहे. तिच्या लूकमागचं गुपित उघड झालं नसलं तरी शिवानीला साडी नेसायला आवडतं. बनमस्का मालिकेतून तिनं घराघरामधील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. मालिकेतील तिची भूमिका रसिकांना आवडत होती. मात्र आता या मालिकेनं रसिकांचा निरोप घेतलाय. त्यामुळे शिवानीसुद्धा सुट्ट्यांच्या मूडमध्ये आहे. पुण्यातील मैत्रिणींसह फॅशनसंदर्भात शिवानी नवनवीन फंडे शोधत असते. सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी तिला काहीना काही नवे प्रयोग करणं भावतं. असाच प्रयोग तिने केल्याचं या फोटोत पाहायला मिळत आहे.
![]()
![]()