हार्दिक जोशी खलनायकाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 11:09 IST2017-02-02T05:38:51+5:302017-02-02T11:09:49+5:30

तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारा राणा म्हणजेच  हार्दिक जोशी हा लवकरच एका आगामी मराठी ...

Hardik Joshi plays the role of villain | हार्दिक जोशी खलनायकाच्या भूमिकेत

हार्दिक जोशी खलनायकाच्या भूमिकेत

झ्यात जीव रंगला या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारा राणा म्हणजेच  हार्दिक जोशी हा लवकरच एका आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. जर्नी प्रेमाची असे या चित्रपटाचे नाव आहे. विशेष म्हणजे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा हा राणा या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटात माधव देवचक्के, अभिषेक सेठिया, काश्मीरा कुलकर्णी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्याचबरोबर आश्लेषा सिंग, वर्षा एरणकर, अतुल अभ्यंकर, पराग बेडेकर या कलाकारांचा ही समावेश आहे. अमोल भावे दिग्दर्शित हा चित्रपट आहे. 
       
         नुकताच या चित्रपटाचा  संगीत प्रकाशन सोहळा, पोस्टर लाँच आणि ट्रेलर प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते. तसेच निर्माते आदिल बलोच, प्रस्तुतकर्ता पार्थ शाह अभिनेते प्रदीप पटवर्धन, अभिनेत्री दीपज्योती नाईक, संगीतकार निखिल कामत, गीतकार आशय परब, विमल कश्यप, गायक पूरण शिवा, गायिका अ‍ॅनी चॅटर्जी हेदेखील उपस्थित होते. पार्थ प्रोडक्शन्स, गुर्जित सिंग बिंद्रा प्रस्तुत आणि एआरबी ९ फिल्म्स निर्मित जर्नी प्रेमाची जर्नी हा चित्रपट आहे.  या चित्रपटाची कथा पटकथा राहुल पंडित, हिलाल अहमद व दिनेश देवळेकर यांनी लिहिली आहे.

             प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतंअसं पाडगावकर म्हणतात खरं, पण प्रेमाची परिभाषा प्रत्येकासाठी खूप वेग-वेगळी असते. दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो. अलगद हळुवारपणे नकळत उलगडणारी ही भावना प्रत्येकाच्या आयुष्यात कधीना कधी डोकावतेचं. प्रेमाचे रंग, रूपं अनेक आहेत. फेब्रुवारी महिना आला की या प्रेमाच्या रंगांना आणखीन उधाण येतं. म्हणूनच प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जाणाºया या फेब्रुवारी महिन्यात येत्या १७ तारखेला जर्नी प्रेमाची हा एक नवीन प्रेम प्रवास असलेला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Hardik Joshi plays the role of villain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.