चाहत्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 22:21 IST2016-02-19T05:17:27+5:302016-02-18T22:21:30+5:30

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेची खूप चर्चा आहे. ही मालिका लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यत सर्वानाच भावणारी आहे. कारण ...

Happy to Shiva Jayanti fans | चाहत्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा

चाहत्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा

ल दोस्ती दुनियादारी या मालिकेची खूप चर्चा आहे. ही मालिका लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यत सर्वानाच भावणारी आहे. कारण या मालिकेत सासू सूनेचा ड्रामा नसून आजची मनमुक्त तरूणाईचे विचार व त्यांची धमाल यात पाहायला मिळते. पण, तरूणांच्या मनात घर करणारी ही मालिका संपत असली तरी त्यातील कलाकारांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. याच मालिकेतील सुजय, अमेय, अ‍ॅना, आशु, मीनू यांनी अक्षरश: याच मालिकेद्वारे धमाल उडवली आहे. याच तरूणांमधीलच शांत, सोज्वळ व समजूतदार अशी भूमिका साकारणारी रेश्मा ही देखील तितकीच चर्चेत होती. कारण प्रत्येक तरूणांच्या ग्रुपमध्ये असे एक कॅरेक्टर असतेच. म्हणून तिची ही भूमिका देखील तितकीच चर्चेत आहे. ही शांत रेश्मा म्हणजेच तरूणांची लाडकी सखी गोखले हिने ट्वििटरवर आपल्या चाहत्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शिवमहाराजांच्या प्रति असणारा अभिमानदेखील तिने व्यक्त केला आहे.

Web Title: Happy to Shiva Jayanti fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.