लग्नाला महिना पूर्ण...! शिवानी रांगोळे व विराजस कुलकर्णीनं शेअर केले वेडिंगचे Unseen Photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 14:19 IST2022-06-03T14:17:05+5:302022-06-03T14:19:47+5:30
Shivani Rangole and Virajas Kulkarni One Month Anniversary: बरोबर महिनाभरापूर्वी आजच्याच तारखेला मराठी इंडस्ट्रीतलं एक लोकप्रिय कपल लग्नबेडीत अडकलं होतं. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता विराजस कुलकर्णी यांच्याबद्दल.

लग्नाला महिना पूर्ण...! शिवानी रांगोळे व विराजस कुलकर्णीनं शेअर केले वेडिंगचे Unseen Photo
बरोबर महिनाभरापूर्वी आजच्याच तारखेला मराठी इंडस्ट्रीतलं एक लोकप्रिय कपल लग्नबेडीत अडकलं होतं. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole ) व अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) यांच्याबद्दल. होय, गेल्या 3 मे रोजी दोघांचा मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला होता. आज 3 जून रोजी या लग्नाला एक महिना पूर्ण झाला. शिवानीच्याच शब्दांत सांगायचं तर अगदी डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच महिना झाला.
लग्नाला महिना झाल्याचं सेलिब्रेशन तर बनतंच. लग्नाला महिना पूर्ण होताच शिवानीने लग्नाचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये काही धम्माल क्षण आहेत, काही भावुक करणारे क्षण आहेत. विराजसनेही लग्नाला महिना होताच लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.
शिवानी व विराजसच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर विराजस व शिवानीच्या लग्नाचं ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडलं होतं.
शिवानी व विराजस दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. ‘डावीकडून चौथी बिल्डिंग’ या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच दोघांची ओळख झाली होती. या नाटकाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि मग ही मैत्री प्रेमात बदलली.
विराजसनं ‘होस्टेल डेज’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. विराजस फक्त अभिनेता नाही तर तो एक दिग्दर्शकही आहे. अनाथेमा या नाटकात त्यांनं अभिनयाबरोबर दिग्दर्शनाचीही जबाबदारी स्वीकारली होती. तसंच रमा माधव चित्रपटासाठी मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होत. याशिवाय मिकी, डावीकडून चौथी बिल्डिंग, भंवर यासारख्या काही नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शनही त्याने केलं आहे.
शिवानीबद्दल सांगायचं तर बनमस्का मालिकेमुळे शिवानी रांगोळे हे नाव घराघरांत पोहोचलं. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. सांग तू आहेस ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा या मालिकांमध्ये ती झळकली.