आकाश ठोसरला वाढदिवसाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 14:04 IST2017-02-24T08:30:51+5:302017-02-24T14:04:42+5:30
आपल्या अभिनयाने अभिनेता आकाश ठोसर याने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्याच्या सैराट या चित्रपटाने संपूर्ण राज्यात झिंगाट परिस्थिती ...
आकाश ठोसरला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आ ल्या अभिनयाने अभिनेता आकाश ठोसर याने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्याच्या सैराट या चित्रपटाने संपूर्ण राज्यात झिंगाट परिस्थिती निर्माण केली आहे. आज ही या चित्रपटाची चर्चा तितकीच रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या चित्रपटाने जागतिक पातळीवरदेखील यश मिळविले आहे. आकाशची परशा ही भूमिका प्रेक्षकांच्या प्रंचड पसंतीस उतरली आहे. त्याचबरोबर परशा आणि आर्चीची जोडी आज ही प्र्रेक्षकांचे मन जिंकत आहे. आज ही आकाशला पाहण्यासाठी तरूणांईची गर्दी मोठया प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे. अशा या तरूणांईच्या लाडक्या कलाकाराला सोशलमीडियावर वाढदिवसाच्या प्रचंड प्रमाणात शुभेच्छा मिळाल्या आहेत. त्याच्यावर सोशलमीडियावर वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे.
आकाशला सैराट या चित्रपटानंतर लॉटरी लागली असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटानंतर त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पाय ेरोवले असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्गज दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात काम करण्याचे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. ते स्वप्न आकाश ठोसरचे लवकरच पूर्ण झाले असल्याचे पाहायला मिळते. कारण सैराट चित्रपटानंतर तो लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित एफयू या चित्रपटात झळकणार आहे. त्याच्या या चित्रपटाची चर्चा खूपच रंगत असल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटात त्याच्यासोबत संस्कृती बालगुडे, सत्या मांजरेकर, मधुरा देशपांडे, मयुरेश पेम, माधव देवचक्के असे अनेक तरूण कलाकार पाहायला मिळणार आहे. त्याच्या आगामी एफयू या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. चला तर पाहूयात आकाशचा हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का?