Happy Birthday: नम्रता गायकवाड यांच्यासोबत साजरा करणार वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2017 16:35 IST2017-03-06T11:05:46+5:302017-03-06T16:35:46+5:30

स्त्री शक्तीचा जागर करण्याचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिवस. महिला हक्क, त्यांचे अधिकार आणि स्वतःच्या अस्तित्वाचा दिवस साजरा करण्याचा ...

Happy Birthday: Happy birthday with Namrata Gaikwad | Happy Birthday: नम्रता गायकवाड यांच्यासोबत साजरा करणार वाढदिवस

Happy Birthday: नम्रता गायकवाड यांच्यासोबत साजरा करणार वाढदिवस

त्री शक्तीचा जागर करण्याचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिवस. महिला हक्क, त्यांचे अधिकार आणि स्वतःच्या अस्तित्वाचा दिवस साजरा करण्याचा महिलांचा हा दिवस. जागतिक महिला दिनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. महिलांचा गौरव, महिलांबाबत विविध भाषणं केली जातात. दिवसभर सर्वत्र महिलांचा कौतुकसोहळा सुरु असतो. अभिनेत्री नम्रता गायकवाड मात्र जागतिक महिला दिन अनोख्या पद्धतीने दरवर्षी साजरा करते. याला कारणही अगदी तसंच आहे. कारण जागतिक महिला दिन हा 8 मार्चला साजरा केला जातो. 8 मार्च हा नम्रता गायकवाड हिचा वाढदिवस आहे. त्यामुळे नम्रतासाठी हा दिवस डबल सेलिब्रेशनचा असतो. मात्र वाढदिवसाच्या दिवशी अवास्तव खर्च आणि नको त्या गोष्टी करण्याऐवजी नम्रता आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करते. तिच्या या सेलिब्रेशनमध्ये तिच्यातलं सामाजिक भान पाहायला मिळतं. यंदाचा वाढदिवस आणि महिला दिन नम्रता दिव्यांगांसोबत साजरा करणार आहे. अंध आणि दिव्यांगांशी संवाद साधत, त्यांच्याशी मजा-मस्ती आणि धम्माल करत हा स्पेशल दिवस स्पेशल पद्धतीने साजरा करण्याचे नम्रताने ठरवले आहे. गेल्या वर्षीसुद्धा नम्रताने आपला वाढदिवस आणि महिला दिन नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात जाऊन साजरा केला होता. त्यावेळी नम्रताने कारागृहातील महिला कैद्यांशी संवाद साधला. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत या महिला कैद्यांसोबत वाढदिवस साजरा केला होता. महिला कैद्यांना तिनं साड्यांचं वाटपही केलं होतं. हे सर्व करतांना तिला मिळणारं समाधान हे त्या वर्षात ती करत असणाऱ्या कामाचा उत्साह वाढविणारा ठरतो. यामुळे यंदाचा जागतिक महिला दिन आणि विशेष म्हणजे वाढदिवससुद्धा नम्रता गायकवाडसाठी खूप स्पेशल  ठरणार आहे.

Web Title: Happy Birthday: Happy birthday with Namrata Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.