डॉ.मोहन आगाशे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 14:51 IST2016-07-23T09:21:05+5:302016-07-23T14:51:05+5:30
चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील अभ्यासू अभिनेते आणि मानसोपचारतज्ञ डॉ. मोहन आगाशे यांचा आज वाढदिवस. पेशाने मानसोपचारतज्ञ असलेले मोहन आगाशे ...

डॉ.मोहन आगाशे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील अभ्यासू अभिनेते आणि मानसोपचारतज्ञ डॉ. मोहन आगाशे यांचा आज वाढदिवस. पेशाने मानसोपचारतज्ञ असलेले मोहन आगाशे यांनी अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी त्यांच्या व्यस्त कामकाजामधून वेळ काढून नाटकांत काम केले आणि नंतर नाटकाच्या दिशेने त्यांच्या करिअरला दिशा मिळाली. नाटक केल्यानंतर त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि बंगाली चित्रपटात काम केले.
जैत रे जैत, सिंहासन, आक्रोश, गंगाजल, त्रिमुर्ती, अब तक छप्पन, असंभव, अपहरण, काय द्यायचं बोला, रंग दे बसंती, वळू, देऊळ, अब तक छप्पन २, देऊळ बंद, वेलकम झिंदगी या चित्रपटात आणि घाशीराम कोतवाल यांसारख्या अनेक नाटकांत आगाशे सरांनी काम केले आहे.
चित्रपट, नाटक यांच्यासह त्यांनी त्यांच्या अभिनयाची जादू दूरचित्रवाणी माध्यमावर पण दाखविली आहे. एका लग्नाची तिसरी गोष्ट, अग्निहोत्र, गुंतता ह्रद्य हे या मालिकेत काम केले आहे.
भारतीय मनोरंजनसृष्टीमध्ये उत्तम कामगिरी बजावल्यामुळे डॉ. मोहन आगाशे यांना भारतीय सरकारकडून १९९६ साली ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
अष्टपैलू अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!