मराठी सिनेमाच्या गाण्यामध्ये पहिल्यांदाच हॉंटिग इफेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 05:21 AM2018-03-21T05:21:32+5:302018-03-21T10:56:33+5:30

मराठी सिनेमात जसा आशय वेगवेगळा हाताळला जातो तसाच मराठी संगीतात देखील आता नवनवीन प्रयोग येऊ लागले आहेत. असाच एक ...

Hanting effect for the first time in Marathi cinema singing | मराठी सिनेमाच्या गाण्यामध्ये पहिल्यांदाच हॉंटिग इफेक्ट

मराठी सिनेमाच्या गाण्यामध्ये पहिल्यांदाच हॉंटिग इफेक्ट

googlenewsNext
ाठी सिनेमात जसा आशय वेगवेगळा हाताळला जातो तसाच मराठी संगीतात देखील आता नवनवीन प्रयोग येऊ लागले आहेत. असाच एक अनोखा प्रयोग आराध्य फिल्म्स निर्मित हिच्यासाठी काय पण या सिनेमात संगीत दिग्दर्शन हर्षित अभिराज यांनी केला आहे. उज्वला पोळ कार्यकारी निर्मात्या असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शक मिलिंद दास्ताने असून, कथा, पटकथा आणि सवांद संतोष पवार यांचे आहे.

मराठीत पहिल्यांदाच गाण्यात हॉंटिग इफेक्ट वापराबद्दल संगीत दिग्दर्शक हर्षित अभिराज म्हणाले की, खरंतर सिनेमात एक गोंधळाचं गाणं आहे, ज्यात देवीच्या शक्तीपीठांचा धावा करण्यात आला आहे. जगदीश पिंगळे यांनी लिहिलेया या गाण्याला आनंद शिंदे आणि मी स्वतः स्वर साज चढवला आहे. विशेष बाब म्हणजे आम्ही पहिल्यांदाच मराठीत या गोंधळाच्या गाण्यासाठी हॉंटिग इफेक्ट वापरत आहोत, जो सिनेमातील कथानकाचा भाग असल्याने आम्ही या गाण्यात त्याचा वापर केला आहे. गोंधळ म्हणजे लोकसंगीताचा प्रकार त्याला हळूच आम्ही संगीतातून हॉंटिग इफेक्टची किनार दिली आहे. हॉंटिग इफेक्ट म्हणजे रहस्यमय संगीत, असं पहिल्यांदाच मराठी सिनेमाच्या गाण्यात होत आहे. शिवाय यात पखवाज देखील आम्ही वापरला आहे शक्यतो गोंधळात कुणी पखवाज वापरत नाही. गाण्याची मधुरता अधिक वाढावी याच उद्देशाने आणि सिनेमाची गोष्ट यातून पुढे याच हेतूने हा नवीन प्रयोग आम्ही केला आहे.

प्रेमासाठी संघर्ष करण्याऱ्या तरुणाची ही गोष्ट आहे. सिनेमात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हिच्यासाठी काय पण हा सिनेमा येत्या १३ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

मंगेश देसाईंकडून एक अलबेला चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांना अलबेलामधील अभिनयासाठी   फिल्मफेअर ‘’सर्वोत्कृष्ट अभिनेता’’ पुरस्काराने गौरवण्यात आले. नृत्याच्या अनोख्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भगवानदादांनी ब्लॅक अॅण्ड व्हाईटचा काळ गाजवला.या नटाच्या भूमिकेसाठी मंगेश देसाई यांनी त्यांचे जुने चित्रपट पाहून त्यांची शैली आत्मसात करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.

Web Title: Hanting effect for the first time in Marathi cinema singing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.