हंसराज जगतापवर का आली परीक्षा सोडण्याची वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 16:58 IST2016-11-17T15:52:15+5:302016-11-17T16:58:33+5:30

अभिनेता हंसराज जगतापने त्याच्या दर्जेदार अभिनयामुळेच राष्ट्रीय पुरस्कारावर देखील मोहोर उमटविली आहे. धग या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे सर्वांनीच कौतुक ...

Hansraj Jagtap's time to leave the exam? | हंसराज जगतापवर का आली परीक्षा सोडण्याची वेळ?

हंसराज जगतापवर का आली परीक्षा सोडण्याची वेळ?

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">अभिनेता हंसराज जगतापने त्याच्या दर्जेदार अभिनयामुळेच राष्ट्रीय पुरस्कारावर देखील मोहोर उमटविली आहे. धग या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे सर्वांनीच कौतुक केले होते. सतत वैविध्यपूर्ण अभिनय करणारा हंसराज आता आपल्याला पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाविषयी लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना हंसराजने अनेक गोष्टींचा उलगडा केला. हंसराज सांगतो, ''अ‍ॅटमगिरी या चित्रपटासाठी दिग्दर्शकांनी मला जवळपास फायनलच केले होते. तरी पण मी स्वत: या भूमिकेसाठी आॉडिशन दिले. शूटिंगचे शेड्युल्ड ज्यावेळी लागले तेव्हाच माझी एफ.वायची परीक्षा सुरु होती. आता करायचे हा मोठा प्रश्न माझ्या समोर उभा होता. परंतु मला चित्रपटांमध्येच करिअर करायचे असल्याने मी परीक्षा सोडून शूटिंगला प्राधान्य दिले. परीक्षेच्या काळात मी या चित्रपटाचे शूटिंग केले. या चित्रपटांमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमध्येही दिसणार आहे. नगर आणि पुण्यात या चित्रपटाचे आम्ही चित्रीकरण केले आहे. शूटिंगचा अनुभव फारच छान होता. या चित्रपटाचे विशेष म्हणजे आमच्या दिग्दर्शकांनी या सिनेमाचे तीन शेवट शूट करुन ठेवले आहेत. तीन वेगवेगळ्या प्रकारचा शेवट पहिल्यांदाच मी या चित्रपटासाठी शूट केला आहे. आता दिग्दर्शकांना जो शेवट आवडेल तोच तुम्हाला चित्रपटात दिसणार आहे. डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित व्हावा असे आम्हाला वाटत होते. परंतु सध्या हजार-पाचशेच्या नोटांचा जो गोंधळ सुरु आहे त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन थोडे लांबणीवर गेले आहे. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला नक्कीच हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो असेही हंसराजने सांगितले आहे. 

Web Title: Hansraj Jagtap's time to leave the exam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.