'हम्पी' सोनालीच्या नजरेतून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 17:11 IST2017-07-01T11:41:43+5:302017-07-01T17:11:43+5:30

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी जे काही करते ते काही हटकेच असतं.सोनालीची प्रत्येक अदा, तिचं सौंदर्य याची कायमच चर्चा होत असते. ...

'Hampi' from Sonali's eyes | 'हम्पी' सोनालीच्या नजरेतून

'हम्पी' सोनालीच्या नजरेतून

िनेत्री सोनाली कुलकर्णी जे काही करते ते काही हटकेच असतं.सोनालीची प्रत्येक अदा, तिचं सौंदर्य याची कायमच चर्चा होत असते. विविध सिनेमांमधील तिने साकारलेल्या भूमिका असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमासाठी तिने केलेली स्पेशल ड्रेसिंग स्टाईल असो, दरवेळी कॅमे-याच्या नजरा सोनालीकडे आपसुकच आकर्षित होत असतात.  आता सोनालीच्या बाबतीत  थोडे वगेळे घडले आहे.नेहमी सोनालीला पाहतचा कॅमे-याच्या नजरा  तिच्याकडे वळतात,मात्र यावेळी 'हम्पी' येथली निसर्गरम्य स्थळांच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळाले.काही दिवसांपूर्वी सोनाली 'हम्पी' येथील वातावरणाचा आनंद घेत होती.मुळात   एका सिनेमाच्या शूटिंगनिमित्ताने सोनाली 'हम्पी' येथे गेली होती.त्यावेळी तिथल्या या आल्हाददायक वातावरण पाहून सोनाली भलतीच खुश झाली.तिथले निसर्गरम्य स्थळांना भेट देत तिने तिथे मस्त फोटोग्राफी करत या स्थळाना आपल्या कॅमे-यात कैद केले आहे. तिथले काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.'हम्पी' येथील आल्हाददायक आणि सुखावणारं वातावरणात मग्न झालेली सोनालीचा सो कुल अंदाजही यावेळी पाहायला मिळाला.मराठी सिनेमा सादरीकरणाची आणि विषयाची चौकट मोडून नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. नवीन प्रेक्षणीय लोकेशन्स आणि त्या अनुषंगाने कथानकाची मांडणी हे मराठी सिनेमाचे वैशिष्ट्य अधोरेखित होऊ लागले आहे.सिनेमाच्या शूटींगमधून मिळालेल्या ब्रेकमध्ये सोनालीने हे सुंदर नयनरम्य स्थळ आपल्या मोबाईलच्या कॅमे-यात टिपले आहेत. मात्र हे फोटो फोटो पाहिल्यानंतर ती एक  उत्कृष्ट अभिनेत्रीसह उत्कृष्ट फोटोग्राफर असल्याचे लक्षात येते.पहिल्यांदाच हम्पी इथे जाऊन एक सिनेमा शूट करण्याची ही पहिलीच वेळ होती. मुळात तिथल्या नयनरम्य लोकेशन्स  पाहून रसिक सिनेमाच्या प्रेमात पडतील इतके सुंदर लोकेशन सिनेमात टिपण्यात आले आहेत.आगामी काळात विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमातून रसिकांच्या भेटीला येण्याचा मानस असल्याचे सोनालीने सांगितले.

Web Title: 'Hampi' from Sonali's eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.