चिमुकल्यांसाठी हाफ टिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2016 09:24 IST2016-04-11T16:24:13+5:302016-04-11T09:24:13+5:30

           लहान मुलांच्या हळव्या कथा रंगविणारे अनेक भावस्पर्षी चित्रपट मोठ्या पडद्यावर आजपर्यंत येऊन गेले आहेत. ...

Half-ticket for smallpox | चिमुकल्यांसाठी हाफ टिकीट

चिमुकल्यांसाठी हाफ टिकीट

 
r />         लहान मुलांच्या हळव्या कथा रंगविणारे अनेक भावस्पर्षी चित्रपट मोठ्या पडद्यावर आजपर्यंत येऊन गेले आहेत. अशा चित्रपटांना प्रेक्षक देखील कौतुकाची थाप देतात. असाच लहान मुलांची कहाणी दर्शविणारा हाफ तिकीट हा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. समीत कक्कड यांच्या आय ना का बायना चित्रपटा नंतर आता ते हाफ तिकीट घेऊन येत आहेत. या फिल्मचे डिजिटल पोस्टर नूकतेच सोशल साईटवर रिवील झाले आहे. 
हाफ तिकीट हा सिनेमा नॅशनल अ‍ॅवॉर्ड विनिंग तामिळ फिल्म काका मुथाई चा रिमेक असणार आहे. यामध्ये लहान मुलांची स्वप्ने आणि अ‍ॅम्बिशिअन दाखविण्यात आले आहेत. चित्रपटाचे लेखन क्षितीज पटवर्धन यांचे आहे. तर जी.वी प्रकाश यांचे म्युझिक असणार आहे. आता हा सिनेमा जसा च्या तसा तामिळ चित्रपटाला कॉपी करतोय कि स्वत:ची वेगळी छाप सोडण्यासाठी थोडा मराठी तडका लावतोय हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल. 

Web Title: Half-ticket for smallpox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.