​गुलाबजामचे चित्रीकरण संपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 10:25 IST2017-05-08T04:55:47+5:302017-05-08T10:25:47+5:30

गुलाबजाम या चित्रपटाची घोषणा काहीच महिन्यांपूर्वी झाली होती. सिद्धार्थ चांदेकरने या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून आमच्या रेसिपीला ...

Gulabjam's filming ended | ​गुलाबजामचे चित्रीकरण संपले

​गुलाबजामचे चित्रीकरण संपले

लाबजाम या चित्रपटाची घोषणा काहीच महिन्यांपूर्वी झाली होती. सिद्धार्थ चांदेकरने या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून आमच्या रेसिपीला सुरुवात झाली असे मार्चच्या सुमारास म्हटले होते आणि आता ही रेसिपी तयार झाल्याची घोषणादेखील त्यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
गुलाबजाम या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरसोबत सोनाली कुलकर्णी, चिन्मय उद्गिरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर हा चित्रपट सचिन कुंडलकरने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यातील विविध भागांमध्ये झाले आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यानचे फोटो कलाकार आपल्या सोशल मीडियावर अपलोड करत होते आणि त्यातूनच या चित्रपटाच्या चित्रीकरणाविषयी माहिती त्यांच्या फॅन्सना देत होते. आता या चित्रपटाचे चित्रीकरण संपले असल्याचे सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे. 
सिद्धार्थने या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे मजा-मस्ती करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत आणि त्यासोबत लिहिले आहे की, आम्ही गुलाबजाम या चित्रपटाचे कालच चित्रीकरण करायला घेतले होते असे मला वाटत आहे आणि आता आमच्या चित्रपटाचे चित्रीकरणदेखील पूर्ण झाले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. हा एक खूप चांगला प्रवास होता असेच मी म्हणेन. या प्रवासासाठी मी सचिन कुंडलकर आणि सोनाली कुलकर्णी यांचे आभार मानतो. तुम्ही दोघे माझ्यासाठी आयुष्यभर स्पेशल राहाल. 
गुलाबजाम या चित्रपटाची घोषणा केल्यापासून या चित्रपटात सिद्धार्थ आणि सोनाली यांची जोडी पाहायला मिळणार आहे की नाही याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. सिद्धार्थ आणि सोनाली यांच्यात खूप वर्षांचे अंतर असल्याने ही जोडी प्रेक्षकांना एक हटके अनुभव देईल यात काही शंकाच नाही. 

Web Title: Gulabjam's filming ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.