फोटोत दिसणाऱ्या 'या' दोन दिग्गज कलाकारांना ओळखलं का? मराठी कलाविश्वात आहे प्रचंड दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 10:59 IST2022-03-31T10:58:25+5:302022-03-31T10:59:31+5:30

Marathi actor: सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला फोटो मराठी कलाविश्वातील दोन दिग्गज अभिनेत्यांचा आहे. या दोन्ही कलाकारांना अनेक नाटकं, चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

guess who this marathi actors seen in the photo | फोटोत दिसणाऱ्या 'या' दोन दिग्गज कलाकारांना ओळखलं का? मराठी कलाविश्वात आहे प्रचंड दबदबा

फोटोत दिसणाऱ्या 'या' दोन दिग्गज कलाकारांना ओळखलं का? मराठी कलाविश्वात आहे प्रचंड दबदबा

सध्याच्या काळात सोशल मीडिया प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी इन्स्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. यात गेल्या काही काळात अनेक कलाकार मंडळी त्यांचे थ्रोबॅक फोटो शेअर करत चाहत्यांसोबत त्यांच्या जुन्या आठवणी शेअर करत आहेत. यामध्येच सध्या मराठी कलाविश्वातील दोन दिग्गज अभिनेत्यांचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये या कलाकारांना पाहिल्यावर त्यांना ओळखणंही कठीण असल्याचं दिसून येतं.

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला फोटो मराठी कलाविश्वातील दोन दिग्गज अभिनेत्यांचा आहे. या दोन्ही कलाकारांना अनेक नाटकं, चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही कलाकार सध्याच्या घडीला उत्तम अभिनयकौशल्यामुळे चर्चेत येत आहेत.

भरत जाधवइतकीच शांत आणि सुस्वभावी आहे त्याची पत्नी; जाणून घ्या मिसेस जाधवविषयी

फोटोत दिसणारे हे दोन्ही कलाकार दुसरे तिसरे कोणी नसून अभिनेता अंकुश चौधरी आणि भरत जाधव आहेत. या दोघांचा हा फोटो प्रचंड जुना आहे. हा फोटो दोन्ही कलाकारांच्या सुरुवातीच्या काळातला असल्याचं पाहायला मिळतं.

विशेष म्हणजे या फोटोवरुन त्यांची मैत्री किती जुनी आहे हे स्पष्टपणे दिसून येतं. हा फोटो अभिनेता भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्याने अंकुश चौधरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: guess who this marathi actors seen in the photo