Exclusive संस्कृती करणार बत्ती गुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 13:36 IST2016-08-30T08:06:22+5:302016-08-30T13:36:22+5:30
प्रियांका लोंढे ...

Exclusive संस्कृती करणार बत्ती गुल
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;"> प्रियांका लोंढे
नेहमीच विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे आता बत्ती गुल करणार आहे. आता बत्ती गुल करणार म्हणजे संस्कृती नक्की करणार तरी काय असा प्रश्न आपसूकच तुम्हाला पडला असेल ना . तर जास्त विचार करू नका, कारण संस्कृती बत्ती गुल करणार आहे ती एका चित्रपटात. लवकरच संस्कृतीचा दिल, दिमाग और बत्ती नावाचा चित्रपट येत आहे. या चित्रपटामध्ये बत्ती नावाची मध्यवर्ती भूमिका संस्कृती साकारणार आहे. सोनाली कुलकर्णी, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर, पुष्कराज चिरपुटकर या तगड्या कलाकारांसोबत संस्कृती या सिनेमामध्ये झळकणार आहे. संस्कृतीने सीएनएक्सशी बोलताना या चित्रपटातील तिच्या बत्ती या पात्राविषयी उलगडा केला. संस्कृती सांगते, हा चित्रपट म्हणजे एकदमच धमाल कॉमेडी आहे. मी पहिल्यांदाच अशाप्रकारची विनोदी भूमिका साकारणार आहे. चित्रपट विनोदी असल्याने चित्रीकरणाच्या वेळी सेटवर फारच मजा यायची. बत्ती नावाचे माझे कॅरेक्टर यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नाव जसे हटके आहे तशीच माझी भूमिका देखील हटके आणि इंटरेस्टींग आहे. अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात असल्याने सुरूवातीला दडपण आले होते. परंतू सर्वांनीच मला छान सांभाळून घेतले. दिलीप प्रभावळकर, सोनाली , वंदना गुप्ते या सर्वांनीच आमची अगदी खाण्यापिण्यापासून काळजी घेतली. या कलाकारांकडून खुप काही शिकायलाही मिळाले. पुण्यामध्ये सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
![]()