द ग्रेट खलीला ही सैराटचे येड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 12:39 IST2016-05-03T07:09:17+5:302016-05-03T12:39:17+5:30

संपूर्ण महाराष्ट्राला सैराट या चित्रपटाने झपाटून ठेवले आहे. कधी ही चित्रपटगृहापर्यत न पोहोचणारा माणूस देखील सैराट चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकतेने थिएटरपर्यत पोहचला आहे. पहिले दोन ते तीन दिवस संपूर्ण राज्यात या चित्रपटाचे बॉक्सआॅफीसवर हाऊसफुलचे फलक पाहायला मिळाले

The Great Khalihi is the Saraat Yad | द ग्रेट खलीला ही सैराटचे येड

द ग्रेट खलीला ही सैराटचे येड

पूर्ण महाराष्ट्राला सैराट या चित्रपटाने झपाटून ठेवले आहे. कधी ही चित्रपटगृहापर्यत न पोहोचणारा माणूस देखील सैराट चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकतेने थिएटरपर्यत पोहचला आहे. पहिले दोन ते तीन दिवस संपूर्ण राज्यात या चित्रपटाचे बॉक्सआॅफीसवर हाऊसफुलचे फलक पाहायला मिळाले. या चित्रपटाने या दिवसात करोडो रूपायाचा गल्ला देखील पार केला. तर यातील अजय-अतुलच्या झिंगाट या गाण्यावर रसिक प्रेक्षकांना थिएटरसमध्येदेखील पाय थिरकण्याचा मोह आवरला नाही. अशा या सुपरहीट सैराटचे कौतुक करण्यास जगभरात आपले स्थान निर्माण करणारा द ग्रेट खली याने देखील सैराटचे भरभरून कौतुक केल्याचा एक व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये खली म्हणाला, या चित्रपटाची भाषा समजत नसली तरी यातील गाण्यांचे संगीत मला खूप भावले आहे. असो, पण इतक्या मोठया माणसाने सैराटची घेतलेली दखल ही एक यशाची पावतीच म्हणावी लागेल. 


Web Title: The Great Khalihi is the Saraat Yad