शेफ देवव्रत जातेगावकर यांनी साकारली भव्य त्रिमूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 15:31 IST2017-02-25T10:01:13+5:302017-02-25T15:31:13+5:30
भारताचे प्रसिद्ध शेफ देवव्रत जातेगावकर यांनी या कलेत खूपच प्रावीण्य मिळवले आहे. इतकेच नाही, तर त्याही पुढे जाऊन मार्जरीन ...

शेफ देवव्रत जातेगावकर यांनी साकारली भव्य त्रिमूर्ती
ारताचे प्रसिद्ध शेफ देवव्रत जातेगावकर यांनी या कलेत खूपच प्रावीण्य मिळवले आहे. इतकेच नाही, तर त्याही पुढे जाऊन मार्जरीन शिल्पकार म्हणून ख्याती असलेले देवव्रत एका अद्भुत कलेचा नमुना प्रेक्षकांसमोर घेऊन आले आहेत. सान्ताक्रुज येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस आंतरदेशीय (डॉमेस्टिक) विमानतळाच्या आवारात देवव्रत मार्जरीनची 'त्रिमूर्ती' साकारली आहे भारतातील प्रसिद्ध लेण्यांची देणगी असलेल्या या 'त्रिमूर्ती' चे मार्जरीन शिल्प ८ बाय ६.५ फुट उंचीचे बनवण्यात आले आहे. या भव्य शिल्पासाठी तब्बल १५१२ किलो मार्जरीन वापरण्यात आले. नुकत्याच २४ फेब्रुवारीला झालेल्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर लोकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले असून, या भव्य शिल्पाचे कामकाज अवघ्या १० दिवसात पूर्ण करण्यात आले. १४ फेब्रुवारी रोजी सुरु करण्यात आलेले हे कामकाज निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी दिवसाचे १४ तास देवव्रत या कार्व्हिंग कलाकारीसाठी सदर ठिकाणी व्यस्त असायचे.
याबद्दल आपले मत व्यक्त करताना देवव्रत यांनी सांगितले की, 'भारतीय संस्कृतीत 'त्रिमूर्ती'ला अढळ स्थान आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक या त्रीमुर्तीत आहे, जे निर्मिती, संगोपन आणि विनाश ह्या जीवनातील महत्वाचे तीन पैलू स्पष्ट करतात, ज्या कधीच बदलत नाही, केवळ आपल्याच नव्हे तर जगातील इतर संस्कृतीला देखील पैलू लागू होतात. जगात येणाºया प्रत्येकाला या घटकांमधून जावंच लागतं, आपल्या भारतीय संस्कृतीचे हे मूळ असून याची महती जागतिक पातळीवर करून देण्याचा माझा मानस आहे. शिवाय कार्व्हिंगची कला मला अंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील जोपासायची असल्यामुळे, इतर कोणत्या शिल्पापेक्षा 'त्रिमूर्ती' रेखाटून भारतीय संस्कृतीचे प्रतिक लोकांसमोर सादर करणे मला योग्य वाटले.' ही मार्जरीनरुपी त्रीमुर्ती नागरिकांना विनामुल्य पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. फळे आणि भाज्या कार्व्हिंगमध्ये देवव्रत यांनी कौशल्य विकसित करून ती आपली खासियत बनवली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत, तर मार्जरीन शिल्पकलेतदेखील सुवर्णपदक पटकावले आहे.