सैराटवर शासकीय शुभेच्छांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 16:20 IST2016-05-11T10:50:18+5:302016-05-11T16:20:18+5:30
सैराट...सैराट..सैराट... ज्या चित्रपटाची प्रेषक आतुरतेने वाट पाहत होते तो चित्रपट २९ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आणि आजच्या तारखेपर्यंत (११ ...
.jpg)
सैराटवर शासकीय शुभेच्छांचा वर्षाव
स राट...सैराट..सैराट... ज्या चित्रपटाची प्रेषक आतुरतेने वाट पाहत होते तो चित्रपट २९ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आणि आजच्या तारखेपर्यंत (११ मे पर्यंत) सर्व सिनेमागृहात सैराटचे शो हाऊसफुल आहेत. म्हणजे चक्क ११ दिवसांत सैराटने ४१ कोटी कमावले.
सैराटच्या चित्रपटाविषयी संपूर्ण मराठी इंडस्ट्रीपासून बॉलिवूड पर्यंत सर्वांनी कौतुक केले. यापेक्षा महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपूर्ण सैराट टिमचा मुख्यमंत्री निवासस्थान 'वर्षा' येथे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात सैराट चित्रपटाला पाच हजार सिनेमागृह मिळाले होते परंतु सैराटचे हाऊसफुल शो पाहता आता त्याला पंधरा हजार सिनेमागृह मिळाले. सैराटच्या या सततच्या हाऊसफुल शो मुळे १३ मे आणि २० मे ला प्रदर्शित होणारे मराठी चित्रपटदेखील लांबणीवर नेण्यात आले.
जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेला नटसम्राट या चित्रपटाने ४० कोटीचा बिझनेस केला होता पण सैराटने ४१ कोटी कमवून नटसम्राटचा रेकॉर्ड ब्रेक केला ते देखील फक्त ११ दिवसातच. सैराट याहून जास्त कमाई करले यात शंका नाही.