Good News: मनवा नाईकची सुरू झाली लगीनघाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 12:22 IST2017-03-16T12:59:35+5:302017-03-17T12:22:26+5:30

‘आया मौसम लग्नाचा’ म्हणत आपली लाडकी मनवा नाईकही तिच्या लग्नाच्या तयारीला लागली आहे.होय, अभिनेत्री आणि निर्माती मनवा नाईक लवकरच ...

Good news: Manwa Naik has started | Good News: मनवा नाईकची सुरू झाली लगीनघाई

Good News: मनवा नाईकची सुरू झाली लगीनघाई

या मौसम लग्नाचा’ म्हणत आपली लाडकी मनवा नाईकही तिच्या लग्नाच्या तयारीला लागली आहे.होय, अभिनेत्री आणि निर्माती मनवा नाईक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. निर्माता सुशांत तुंगारेसह मनवा लग्नाच्या गाठीत अडकणार आहे.नुकतेच मनवाची मेहंदी सेरेमनी पार पडली.यावेळी मनवाला शुभेच्छा देण्यासाठी क्षिती जोग, क्रांती रेडकर, चिन्मयी सुमीत यांच्यासह मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळी मनवाच्या घरी लग्नाचे प्रि-सेलिब्रेशन करताना दिसले.मनवाप्रमाणे क्रांती आणि क्षितीसह इतर अभिनेत्रीही आपल्या हातावर मेहंदी काढत मनवाच्या आनंदात सहभागी झाल्याचे दिसल्या.तर दुसरीकडे सुशांत तुंगारेही त्यांच्या लग्नासाठी खूप आनंदीत असून त्याने त्याच्या इन्स्टा पेजवर काऊंटडाऊन बिगीन्स अशी पोस्टही टाकली आहे.नुकतेच आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारे मराठी मनोरंजन दुनियेतील अभिनेता आणि अभिनेत्री रेशीमगाठीत अडकले आहेत.अभिनेत्री मृण्मयी देशपांडे,श्रृती मराठे, पल्लवी पाटील या अभिनेत्री कुणी आपला जोडीदार स्वतः निवडत लव्ह मॅरेज करणे पसंत केले आहे. तर काहींनी आपल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या पसंतीला सकारात्मक होकार देत लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.

Web Title: Good news: Manwa Naik has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.