& जरा हटके टीमची लोकमत कार्यालयाला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 19:16 IST2016-07-20T13:46:03+5:302016-07-20T19:16:03+5:30

 & जरा हटके या चित्रपटाची कथा आई - मुलगी आणि वडील-  मुलगा यांच्या नात्याभोवती फिरते. आई आणि वडील जेव्हा ...

Go to the office of the Lokmat Office | & जरा हटके टीमची लोकमत कार्यालयाला भेट

& जरा हटके टीमची लोकमत कार्यालयाला भेट

 &
जरा हटके या चित्रपटाची कथा आई - मुलगी आणि वडील-  मुलगा यांच्या नात्याभोवती फिरते. आई आणि वडील जेव्हा मध्यमवयात पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतात. या दोघांनाही मूलं आहेत, त्यामुळे या दोघांची मुले यांच्या नात्याला कितपत आणि कसं स्वीकारतात हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केलं आहे. दोन पिढ्यांमधील जनरेशन गॅप, आई- मुलगी वडील - मुलगा यांच्यातील हेवेदावे अगदी संवेदनशील पद्धतीने या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न प्रकाश कुंटे यांनी केला असल्याचे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी लोकमत आॅफीस भेटीदरम्यान सांगितले. यावेळी सिध्दार्थ मेनन, शिवानी रांगोळे आदि उपस्थित होते.
       नटरंग, बालक पालक आणि टाईमपास यांसारखे दर्जेदार चित्रपट देणारे रवी जाधव हे दिग्दर्शक आपल्या प्रत्येक चित्रपटाचं प्रमोशन त्यांनी अगदी हटके पद्धतीने केला आहे. मग तो बालक -पालक असो किंवा टाईमपास असो त्यासाठी त्यांनी वापलेली प्रमोशन क्लुप्ती वाखण्याजोगी होती. तर इरॉस इंटरनॅशनल ही चित्रपट निर्मितीतली आघाडीची निर्मिती संस्था आहे. इरॉस इंटरनॅशनल ने आतापर्यंत अनेक नावाजलेले सिनेमे हिंदी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. रवी जाधव आणि इरॉस इंटरनॅशल या दोघांची निर्मिती असलेला & जरा हटके हा चित्रपट  संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
       या चित्रपटात दाखवली जाणाºया  प्रौढ भावनिक प्रेमकथेने मला आकर्षित केले. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मी रवी जाधव यांच्यासारख्या सृजनशील आणि स्पष्ट सौंदर्यदृष्टी असलेल्या दिग्दर्शकाशिवाय दुसºया कुणाचा विचार करू शकत नव्हते. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. तर संदीप खरे आणि मंगेश कांगणे यांच्या गीतांना आदित्य बेडेकर यांनी संगीत दिलं आहे तर शैल हाडा, हमसिका अय्यर आणि शाशा तिरुपती यांनी सिनेमातील गाण्यांना स्वरबद्ध केले आहे. मयूर हरदास यांनी सिनेमाचे संकलन केले असून वासुदेव राणे यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. मृणाल कुलकर्णी, इंद्रनील सेनगुप्ता, सिद्धार्थ मेनन, शिवानी रांगोळे, सुहास जोशी. सोनाली खरे, स्पृहा जोशी यांच्या भूमिका आपल्याला या सिनेमात

Web Title: Go to the office of the Lokmat Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.