सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 07:15 IST2018-08-27T16:47:19+5:302018-08-28T07:15:00+5:30

फॅशनच्या दुनियेत सध्या सई ताम्हणकर सर्वाधिक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. 'लव्ह सोनिया' सिनेमामुळे सई ताम्हणकर चांगलीच चर्चेत आली आहे.

The glamorous version of Sai Tamhankar | सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज

सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज

ठळक मुद्देआगामी ‘लव्ह सोनिया’ या बॉलिवूड सिनेमात सई दिसणार आहे

फॅशनच्या दुनियेत सध्या सई ताम्हणकर सर्वाधिक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. 'लव्ह सोनिया' सिनेमामुळे तर आता सई ताम्हणकर चांगलीच चर्चेत आली आहे.  त्यामुळे अर्थातच यंदा लॅक्मे फॅशन वीकमध्ये सई ताम्हणकरला एक नाही, दोन नाही तर तीन-तीन डिझायनरकडून आमंत्रण आले होते.

पुनीत बलाना, दिशा पाटील आणि ज्युली शाह ह्या तीन डिझाइनर्सच्या फॅशन शोला सईला विशेष आमंत्रण होते. आणि ह्या तीन डिझाइनर्सच्या तीन वेगवेगळ्या शोजमध्ये सईचे तीन ग्लॅमरस अंदाज दिसून आले.   

पुनीत बलानाच्या शोमध्ये सई मोनोक्रोमॅटिक ग्राफिक शॉर्ट ड्रेसमध्ये आली होती. मोनोक्रोमॅटिक ड्रेससोबत पोनीटेल आणि ब्लू आयलाइनरमूळे तिचा एलिगन्ट लूक दिसून येत होता. सईच्या ह्या बोहो-चीक लूकमूळे ती फॅशन शोला आलेल्या प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेत होती.  

पुनीत बलानानंतर सईने दिशा पाटीलचाही फॅशन शो अटेंड केला. ह्या शोला सई थ्री पीस लुक मध्ये दिसली. ज्यामध्ये सईने  लव्हेंडर कलरचा  क्रॉप टॉप, पलाझो पँट्स आणि एम्ब्रॉडरी केलेलं जॅकेट घातलं होतं. सईच्या ह्या लुकला खूप प्रशंसा मिळाली. अशावेळी पॅपराझी झाली नसती तरच नवलं. लॅक्मे फॅशन शोच्या रेडकार्पेटवर सईचा हा लूक हिट असल्याचं फॅशन फोटोग्राफर्सच्या न थांबणा-या क्लिक-क्लिकने दिसून आले.

जुली शाहच्या ‘अबजीनी’ कलेक्शन असलेल्या फॅशन शोला येताना सईने पेस्टल पींक कलरचा धोतीकट जम्पसूट घातला होता. न्यूड लिपस्टिक, न्यूड हिल्स आणि फक्त गोल्डन बँगल्समुळे ह्या लूकला एक वेगळंच ग्लॅमर आलं. सईच्या ह्या स्टनिंग इव्हिनिंग लुकमुळे ती फॅशन ब्लोगर्सच्या आकर्षणाचे केंद्र बनली.

आगामी ‘लव्ह सोनिया’ या बॉलिवूड सिनेमाद्वारे सई पुन्हा एकदा आपल्या अभिनायाची चुणूक दाखविण्यासाठी सज्ज झाली आहे. तबरेझ नुरानी यांनी देहविक्रीचं धगधगतं वास्तव मांडणा-या या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. भारतासोबतच संपूर्ण देशाला भेडसावणा-या मानवी तस्करीच्या भीषण वास्तवावर हा सिनेमा भाष्य करतो. 
 

Web Title: The glamorous version of Sai Tamhankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.