गिरीजा जोशी हिचा लग्नानंतरचा पहिलाच चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 17:43 IST2016-07-01T12:09:07+5:302016-07-01T17:43:53+5:30
मुकेश मलिक दिग्दर्शित तो आणि मी हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सुबोध भावे ...
गिरीजा जोशी हिचा लग्नानंतरचा पहिलाच चित्रपट
म केश मलिक दिग्दर्शित तो आणि मी हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री गिरीजा जोशी ही नवीन जोडी पहिल्यांदाच एकत्रित पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात श्वेता शिंदे, प्रसाद ओक, प्रसाद पंडीत, ज्योती म्हाळसे, माधव वझे, दिप सुतार या कलाकारांचा देखील समावेश आहे. तो आणि मी ही एक प्रेमकथा असून या चित्रपटाची निर्मिती यश क्रिएशन्सच्या बॅनर अंतर्गत अंकुश सुतार यांनी केली आहे. तर या चित्रपटाची कथा सुनिल हरिश्चंद्र यांनी लिहिली आहे. तसेच अभिनेत्री गिरीजा जोशी हिचा लग्नानंतरचा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होत आहे. गिरीजा ही अभिनेता चिन्मय उदगीरकरसोबत डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकली होती. असो, पण सुबोध आणि गिरीजा ही नवीन व हटके जोडी प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.