विदयाने केली एक अलबेलाच्या सेटवर गिफ्टची बरसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 13:52 IST2016-06-16T08:22:34+5:302016-06-16T13:52:34+5:30
विद्या बालन एक अलबेला या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. भगवान दादांचा जीवनपट ...

विदयाने केली एक अलबेलाच्या सेटवर गिफ्टची बरसात
व द्या बालन एक अलबेला या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. भगवान दादांचा जीवनपट एक अलबेला या चित्रपटात मंगेश देसाई यांनी भगवान दादांची भूमिका साकारली आहे तर विद्या बालन ही गीता बालीच्या भूमिकेत दिसणार आहेत. याच चित्रपटाच्या सेटवर विद्याने गिफ्टची बरसात केली आहे. विदयाने मंगेश देसाई यांना चित्रपटाच्या शुटिंगच्या शेवटच्या दिवशी सूर्याची प्रतिमा देऊन या सूयार्सारखे नेहमीच तळपत रहा अशा शुभेच्छा दिल्या आहेत. तर युनिटच्या प्रत्येक व्यक्तिला त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी भेटवस्तू देखील विद्याने दिली आहे. तसेच आपण जेव्हा एखाद्या गोष्टीत स्वत:ला समरसून घेतो तेव्हाच समोरच्याचा विचार करून त्याला साजेशी भेटवस्तू त्याला देऊ करतो हे विदयाने दाखवून दिले आहे.