‘गेट वेल Soon..!’ ला ३ वर्ष पूर्ण झाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 11:27 IST2016-06-02T05:57:20+5:302016-06-02T11:27:20+5:30
श्रीकृष्णा मधील छोटा कृष्णा, मुंबई-पुणे-मुंबई मधील ह्रदयमर्दम, एका लग्नाची दुसरी गोष्ट मधील घना नेमकं कोणाला गेट वेल सून म्हणतोय, ...

‘गेट वेल Soon..!’ ला ३ वर्ष पूर्ण झाली
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">श्रीकृष्णा मधील छोटा कृष्णा, मुंबई-पुणे-मुंबई मधील ह्रदयमर्दम, एका लग्नाची दुसरी गोष्ट मधील घना नेमकं कोणाला गेट वेल सून म्हणतोय, अशी चर्चा सुरुवातीला होत होती. कारण ‘गेट वेल सून’ या नाटकातून प्रथमच स्वप्नील जोशी नाट्य रंगभूमीवर येत होता.
ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात १ जून २०१३ रोजी ‘गेट वेल सून’ चा शुभारंभाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि प्रशांत दळवी लिखित ‘गेट वेल सून’ या नाटकाला आज ३ वर्ष पूर्ण झाली. या नाटकामध्ये स्वप्नील जोशी सोबत संदिप मेहता, समिधा गुरु, माधवी नेमकर आणि गायत्री यांचा प्रमुख अभिनय होता.
‘गेट वेल सून’ नाटकाच्या टिमने रसिक प्रेक्षकांना कायम स्मरणात राहावी अशी एक भेट दिली आणि आजच्या दिवशी या नाटकाची पुन्हा एकदा आठवण झाली. आम्ही आशा करतो की हे नाटक परत एकदा रंगभूमीवर यावं.