​‘‘गेला उडत’ चे पोेस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 19:51 IST2016-04-13T02:51:14+5:302016-04-12T19:51:14+5:30

सर्वांचा लाडका व आपल्या विनोदी अभिनयाने तरुणाईच्या गळ्याचा ताईत बनलेला अभिनेता सिद्धार्थ जाधव लवकरच ‘गेला उडत’ या नव्या नाटकात ...

'Get Out' Poisser Release | ​‘‘गेला उडत’ चे पोेस्टर रिलीज

​‘‘गेला उडत’ चे पोेस्टर रिलीज

्वांचा लाडका व आपल्या विनोदी अभिनयाने तरुणाईच्या गळ्याचा ताईत बनलेला अभिनेता सिद्धार्थ जाधव लवकरच ‘गेला उडत’ या नव्या नाटकात झळकतोय. ह्या आगामी नाटकाचं पोस्टर नुकतच झळकलं. एका सामान्य माणसाची सुपर गोष्ट आपल्याला रंगभूमीवर अनुभवयास मिळणार आहे. 

भद्राकाली प्रोडक्शन आणि थर्ड बेल प्रोडक्शन निर्मित ह्या नाटकाचं लेखन- दिग्दर्शन केदार शिंदे ह्यांनी केले आहे. सिद्धार्थ दीर्घ काळानंतर रंगभूमीवर पुनरागमन करतोय. केदार सरांसोबत ‘लोच्या झाल्या रे’ हे नाटक केल्यानंतर आता पुन्हा दोघेही एकत्र आले असल्याचे सिद्धार्थने सांगितले. यापूर्वी अनेक सिनेमांसाठी त्यांनी एकत्र काम केले आहे. ‘गेला उडत’ या नाटकासाठी सिद्धार्थ खूप उत्साही आहे. येत्या मे महिन्यात हे नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. सामान्य माणसाला मध्यवर्ती ठेऊन गुंफण्यात आलेले हे नाटक म्हणजे फुल आॅन धमाल असणार हे नक्की !

Web Title: 'Get Out' Poisser Release