दिलाचं पाखरू! गौतमी पाटीलच्या नवीन गाण्यात नखरेल अदा; चाहत्यांना केलं घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 13:36 IST2023-10-22T13:35:34+5:302023-10-22T13:36:12+5:30

गौतमीचं "दिलाचं पाखरू" हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. 

Gautami Patil New Song Dilacha Pakhru Viral On Social media | दिलाचं पाखरू! गौतमी पाटीलच्या नवीन गाण्यात नखरेल अदा; चाहत्यांना केलं घायाळ

दिलाचं पाखरू! गौतमी पाटीलच्या नवीन गाण्यात नखरेल अदा; चाहत्यांना केलं घायाळ

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी खान्देश कन्या लावणी क्वीन गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गौतमी पाटीलनं तिच्या डान्सनं साऱ्यांना आपल्या तालावर नाचवलं. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी तिची एक झलक पाहण्यासाठी पाहण्यासाठी तुफान गर्दी होते. त्यामुळे गौतमी या ना त्या कारणामुळे कायमच चर्चेत असते. गौतमीला फॉलो करणाऱ्यांची आणि कार्यक्रमांना गर्दी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तिच्या कार्यक्रमात तरुण बेभान होऊन डान्स करतात. अशातच आता गौतमी. गौतमीचं "दिलाचं पाखरू" हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. 


"दिलाचं पाखरू" गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून गौतमीचा रोमँटिक अदा चाहत्यांना बघायला मिळत आहे.  धुरंधर या युट्यूब चॅनलवर हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. धुरंधर, निधी हेगडे, स्वराज थिटे यांनी हे गाणं गायले आहे. नेटकऱ्यानं गौतमीच्या या गाण्याचं कौतुक केलं आहे. सबसे कातिल गौतमी पाटील अशा कमेंट्स चाहते करताना दिसत आहे. 

गौतमी पाटील आता अभिनेत्री झालीये. तिच्या पहिल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाय. 'घुंगरू' असं गौतमीच्या पहिल्या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचे शूटिंग सोलापूर, मढ, हंपीसह परदेशातदेखील झालं आहे. या सिनेमात गौतमी बाबा गायकवाडसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा कलाकारांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आहे.  हा गौतमीचा पहिलाच सिनेमा असून ती अतिशय उत्सुक आहे. या माध्यमातून गौतमीचं स्वप्नच साकार झालं आहे.

शिवाय, गौतमी आणि गर्दी हे जणू आता समीकरणच झालं आहे. राज्यातील असा एक जिल्हा नसेल जिथे गौतमीचा कार्यक्रम होत नसेल. अगदी वाढदिवसानिमित्तही गौतमीला बोलावलं जातं. गौतमीच्या डान्सला आणि तिच्या कार्यक्रमांना विरोध होत असला तरी तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तिच्याविषयी छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Web Title: Gautami Patil New Song Dilacha Pakhru Viral On Social media