सबसे कातील गौतमी पाटील गौतमीचं नवं गाण पाहिलंत का? 'घोटाळा' तून चाहत्यांना केलं घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 16:21 IST2023-12-19T16:19:26+5:302023-12-19T16:21:06+5:30

सबसे कातील गौतमी पाटीलचं "घोटाळा" हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. 

Gautami Patil Gautami's new song out | सबसे कातील गौतमी पाटील गौतमीचं नवं गाण पाहिलंत का? 'घोटाळा' तून चाहत्यांना केलं घायाळ

सबसे कातील गौतमी पाटील गौतमीचं नवं गाण पाहिलंत का? 'घोटाळा' तून चाहत्यांना केलं घायाळ

गौतमी पाटील ही तिच्या नृत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकते. गौतमीच्या अदा आणि तिचा डान्स हा प्रेक्षकांना घायाळ करतो.  सध्याच्या घडीला तरुणाईमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारी मराठी सेलिब्रेटीमध्ये गौतमीचे नाव घ्यावे लागेल. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी तिची एक झलक पाहण्यासाठी पाहण्यासाठी तुफान गर्दी होते.  अशातच आता सबसे कातील गौतमी पाटीलचं "घोटाळा" हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. 

 "घोटाळा" गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून गौतमीचा रोमँटिक अदा चाहत्यांना बघायला मिळत आहे.  'Being Filmy Creations' या युट्यूब चॅनलवर हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. वैष्णवी आदोडेनं हे गाणं गायले आहे. नेटकऱ्यानं गौतमीच्या या गाण्याचं कौतुक केलं आहे. सबसे कातिल गौतमी पाटील, लय भारी आणि कडक, अशा विविझ कमेंट्स चाहते करताना दिसत आहे.  गाण्याला आतापर्यंत 91,609  व्ह्यूज मिळाले असून 5.2K एवढे लाईक्स या गाण्याला मिळाले आहे.

यापुर्वी गौतमी पाटीलच्या  'माझा कारभार सोपा नसतोय रं', 'दिलाचं पाखरू', 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम', 'पाटलांचा बैलगाडा' या गाण्यांना प्रेक्षकांनी खूपच चांगली पसंती दिली होती. शिवाय आता गौतमी ही कलाकारांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  गौतमी ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.

गौतमी जेवढी लोकप्रिय आहे तेवढीच तिच्यावर होणारी टीकाही लक्ष वेधून घेत असते. तरीही तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील असा एक जिल्हा नसेल जिथे गौतमीचा कार्यक्रम होत नसेल. तिच्याविषयी छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Web Title: Gautami Patil Gautami's new song out