अभिनेत्री गौतमी देशपांडेच्या निखळ हास्यावर फॅन्स झाले फिदा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 06:00 IST2020-05-27T06:00:00+5:302020-05-27T06:00:00+5:30

गौतमीच्या या निखळ हास्यावर तिचे फॅन्स फिदा झाले आहेत.

Gautami deshpande share new photo on instagram gda | अभिनेत्री गौतमी देशपांडेच्या निखळ हास्यावर फॅन्स झाले फिदा, म्हणाले...

अभिनेत्री गौतमी देशपांडेच्या निखळ हास्यावर फॅन्स झाले फिदा, म्हणाले...

अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत. सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे.

अभिनेत्री गौतमी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. गौतमी इन्स्टाग्रामवर तिचा सायकल सोबतचा फोटो शेअर केला आहे. यात फोटोमध्ये गौतमी आनंदी दिसतेय. गौतमीच्या या निखळ हास्यावर तिचे फॅन्स फिदा झाले आहेत. गौतमीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. प्रिटी, ब्युटीफुल अशा कमेंट्स तिच्या या फोटोवर आल्या आहेत. 

गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. काही दिवसांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Web Title: Gautami deshpande share new photo on instagram gda