गौरी नलावडे हटके अंदाजात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 16:54 IST2016-07-31T11:24:56+5:302016-07-31T16:54:56+5:30
Exculsive - बेनझीर जमादार स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात ...

गौरी नलावडे हटके अंदाजात
स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वैदही म्हणजेच गौरी नलावडे ही एकदम हटके अंदाजात तिच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. हा तिचा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी ती स्वप्नील जोशी व सचित पाटील यांच्यासोबत फ्रेंडस या चित्रपटात दिसली होती. यानंतर गौरी नक्की काय करते या जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक होते. पण आता, तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. गौरी ही लवकरच आपल्या एकदम हटक्या अंदाजात एका आगामी चित्रपटात झळकणार आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना गौरी नलावडे म्हणाली, हो, मी लवकरच एका हटके अंदाजात चित्रपटात पाहायला मिळेल. या चित्रपटातील माझी भूमिका खूप वेगळया स्वरूपाची आहे. मी आजपर्यत कधी ही असा रोल केला नाही. तसेच कधी विचार देखील केला नव्हता, की मी असा चित्रपट करेन. माझं झोन सोडून मी हा चित्रपट केला आहे. या चित्रपटाबद्दल खूप काही सांगू शकणार नाही. पण एवढेच म्हणेन की, इंटरेस्टिंग चित्रपट आहे. या चित्रपटात माझ्यासोबत मराठी इंडस्ट्रीतील दोन नावाजलेले कलाकार पाहायला मिळतील. पण या चित्रपटाचे नाव अजून गुलदस्त्यातच आहे. यासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. चला तर पाहूयात, गौरी नक्की प्रेक्षकांना तिच्या वेगळ््या अदांजात कोणता धक्का देणार आहे.