​गौरव घाटणेकर बनला रेडिओ जॉकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 12:47 IST2017-02-13T07:17:24+5:302017-02-13T12:47:24+5:30

तुज विन सख्या रे या मालिकेमुळे नावारूपाला आलेला अभिनेता गौरव घाटणेकरने छोट्या पडद्यावर काम करण्यासोबतच अनेक चित्रपटांमध्येदेखील काम केले ...

Gaurav Ghatnekar became a radio jockey | ​गौरव घाटणेकर बनला रेडिओ जॉकी

​गौरव घाटणेकर बनला रेडिओ जॉकी

ज विन सख्या रे या मालिकेमुळे नावारूपाला आलेला अभिनेता गौरव घाटणेकरने छोट्या पडद्यावर काम करण्यासोबतच अनेक चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. तुझी माझी लव्हस्टोरी या चित्रपटातील त्याचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते. गौरवने काहीच महिन्यांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठेसोबत विवाह केला. 
गौरव आता प्रेक्षकांना एका चित्रपटात झळकणार असून या चित्रपटातील त्याची भूमिका खूपच वेगळी असणार आहे. गौरव रेडिओ नाइट्स या चित्रपटात रेडिओ जॉकीची भूमिका साकारणार आहे. रेडिओ जॉकीची भूमिका तो त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच साकारणार आहे. 
रेडिओ नाइट्स हा चित्रपट आतापर्यंतच्या सगळ्या मराठी चित्रपटांपेक्षा वेगळा असणार आहे. हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर असून या चित्रपटात एका रेडिओ जॉकीच्या आयुष्यात घडलेली गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रात्रभर चालणाऱ्या एका एफ एफ रेडिओच्या कार्यक्रमात रेडिओ जॉकीला एक निनावी मुलीचा फोन येतो आणि ती संकटात सापडली असल्याचे त्याला सांगते, पण त्या मुलीचे सात वर्षांपूर्वीच निधन झाले असल्याने त्या रेडिओ जॉकीला कळते. त्यामुळे तो फोन कसा आला, तो कोणी केला आणि त्यानंतर पुढे काय होते अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना हा चित्रपट पाहिल्यानंतर मिळणार आहेत. 
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद आचरेकर यांनी केले असून प्राइम डायरेक्टने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात गौरवसोबत कादंबरी कदम प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तुज विन सख्या रे या मालिकेतील त्याची आणि कादंबरीची जोडी खूप गाजली होती. या मालिकेनंतर आता रेडिओ नाइट्स या चित्रपटात प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री पाहाता येणार आहे. 

Web Title: Gaurav Ghatnekar became a radio jockey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.