​गौरव जगभरातील कलाकार आणि तंत्रज्ञांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 10:28 IST2016-07-11T04:58:05+5:302016-07-11T10:28:05+5:30

आठवा गोल्ड कॅमेरा पुरस्कार 2016 नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्यात एंजल्स शेफर्ड या सिनेमाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमाचा पुरस्कार ...

Gaurav Artists and Technicians from around the world | ​गौरव जगभरातील कलाकार आणि तंत्रज्ञांचा

​गौरव जगभरातील कलाकार आणि तंत्रज्ञांचा

वा गोल्ड कॅमेरा पुरस्कार 2016 नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्यात एंजल्स शेफर्ड या सिनेमाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमाचा पुरस्कार मिळाला. 'परफेक्ट प्लान' या हिंदी सिनेमाला सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमा गटातील (हिंदी) पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या वतीने आयोजित 8वा गोल्ड कॅमेरा पुरस्कार सोहळ्यासाठी अवघं तारांगण अवतरलं होतं. बॉलीवुड, मराठी आणि विविध क्षेत्रातील मंडळींनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. यांत अनुप जलोटा, रोहिणी हट्टंगडी, सुनील पाल, अरुण नलावडे, अलका कुबल, मकरंद अनासपुरे, गोविंद नामदेव, दिलजीत कौर, दीपशिखा यासह विविध सेलिब्रिटींनी या पुरस्कार सोहळ्यात उपस्थिती लावली.यंदाच्या सोहळ्यात भारतासह परदेशातील विविध सिनेमांना वेगवेगळ्या गटात गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफरचा पुरस्कार ब्लू माऊंटन सिनेमाला प्राप्त झाला.. या सिनेमाचे दिग्दर्शक सुमन गांगुली आणि चंद्रशेखर राठ यांना सिनेमॅटोग्राफरच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट बालसिनेमा पुरस्कार धर्मेश पंडित यांच्या यारो समझा करो या सिनेमानं पटकावला.. सर्वोत्कृष्ट राजकीय विषयावरील सिनेमाचा पुरस्कार एक उडाण हौसलों से भारी, सर्वोत्कृष्ट ऍनिमेशन सिनेमाचा पुरस्कार बाल गणेशा-3, सर्वोत्कृष्ट संस्कृत सिनेमाचा पुरस्कार इशिती या सिनेमानं पटकावला.


NIFF आंतरराष्ट्रीय कौतुकास्पद सिनेमा या पुरस्काराचा मान लंडनच्या युटोपिया आणि इराणच्या टू या सिनेमानं पटकावला. याशिवाय कोकणी सिनेमा एनिमी, आसामी सिनेमा फिश इन ए बाऊल, ओडिया सिनेमा पहाडा रा लुहा या सिनेमांनीही या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली.भारतातीलच नाही तर जगभरातील कलाकार, तंत्रज्ञ यांना एका मंचावर आणून त्यांच्या कलेचा गौरव करण्यासाठी नाशिकच्या मुकेश कन्नेरी यांनी या पुरस्काराची सुरुवात केली.. देशात दादासाहेब फाळके पुरस्कार फक्त एका व्यक्तीला दिला जातो.. मात्र चित्रपटसृष्टीत असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांना गौरवण्यासाठी कन्नेरी यांनी नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल अंतर्गत दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्काराची सुरुवात केली.

Web Title: Gaurav Artists and Technicians from around the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.