वयाच्या पंधराव्या वर्षी गश्मीर महाजनीवर आले होते हे संकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 16:06 IST2019-03-21T15:59:27+5:302019-03-21T16:06:37+5:30
अभिनेता गश्मीर महाजनीने आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडली आहे. तसेच त्याने 'मुस्कुराके देख जरा' व 'डोंगरी का राजा' या हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. तुम्हाला माहीत आहे का, गश्मीर महाजनी या क्षेत्रात का आला?

वयाच्या पंधराव्या वर्षी गश्मीर महाजनीवर आले होते हे संकट
'कॅरी ऑन मराठा', 'देऊळबंद', 'कान्हा', 'वन वे तिकिट', 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या मराठी सिनेमातून झळकलेल्या अभिनेता गश्मीर महाजनीने आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडली आहे. तसेच त्याने 'मुस्कुराके देख जरा' व 'डोंगरी का राजा' या हिंदी चित्रपटातदेखील काम केले आहे. तुम्हाला माहीत आहे का, गश्मीर महाजनी या क्षेत्रात का आला?
काही लोक विशिष्ट काम करतात कारण त्यांना ते काम आवडत असते, तर काही लोक काम करतात कारण त्यांना आर्थिक स्थैर्य हवे असते. आणि ही गोष्ट आहे तुमच्या आवडत्या सेलेब्रिटीची. त्याच्याकडे एका वेगळ्याच दृष्टीने बघायला लावणारी! गश्मीर महाजनी या क्षेत्रात आला तो त्याच्यावर आलेल्या आर्थिक संकटामुळे आणि बघा आता तो कुठे आहे ते!
चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याविषयी तो सांगतो, “माझ्यासाठी अभिनय ही गरज होती. मी १५ वर्षांचा होतो तेव्हा आमच्यावर मोठे आर्थिक संकट आले. आमच्यावर खूप मोठे अरिष्ट आले. आमचे पुण्यातील घर सील झाले. माझ्या वडिलांचा व्यवसाय ठप्प झाला होता. कोणीच त्याबाबत काहीच करू शकत नव्हते. तेव्हा त्यावेळी काम करणे ही गरज होती. वयाच्या १५ व्या वर्षी मी माझी स्वत:ची डान्स इन्स्टिट्यूट सुरू केली. दोन वर्षांच्या काळात ही इन्स्टिट्यूट मोठी झाली. मग मी इव्हेण्ट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. आणि त्या काळापासून म्हणजे मी २१ वर्षांचा होतो, तेव्हापासून सगळ्या कर्जांची परतफेड केली. तेव्हा नृत्य आवडीतून आलेले नव्हते. म्हणजे मला नृत्य खूप आवडायचे. पण त्याचे रूपांतर व्यवसायात झाले, कारण मला तशी गरज होती. नाहीतर मी कदाचित नृत्याचा व्यवसाय केलाही नसता. तेव्हा प्रत्येक नकारात्मक गोष्टीतून काहीतरी सकारात्मक घडते. हे काहीसे असे आहे. वयाच्या १७ व्या वर्षी बीएमसीसी कॉलेजमध्ये प्राप्तीकर भरणारा मी एकटाच विद्यार्थी होतो,” गश्मीर सांगतो.
प्रेम, नातीगोती, गॉसिप आणि आपल्या आवडत्या अभिनेत्यांबद्दल आणखी माहिती जाणून घेणं – असा सगळा लवाजमा असलेले नवनवे सेलिब्रिटी चॅट शो तयार करणे हा तर बॉलिवूडचा आवडता ट्रेण्ड आहे. पण स्थानिक मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये आपल्या महान अदाकारीने सगळ्यांवर प्रभाव टाकणा-या कलाकारांचा प्रवास जाणून घेण्याची संधी मिळाली तर? देशातील काही सर्वात मोठ्या स्ट्रीमिंग अॅप्सपैकी एक एमएक्स प्लेयर घेऊन आले आहे फेमसली फिल्मफेअर या आपल्या प्रमुख आकर्षण असलेल्या चॅट शोची स्थानिक आवृत्ती. या शो मध्ये गश्मीर झळकणार आहे.