“मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्यापेक्षा चांगलं...”, प्रवीण तरडेंबद्दल प्रश्न विचारताच गश्मीर महाजनीचं स्पष्ट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 12:56 PM2023-09-11T12:56:20+5:302023-09-11T12:59:11+5:30

प्रवीण तरडेंबद्दल प्रश्न विचारतच गश्मीर महाजनीने दिलं उत्तर, म्हणाला...

gashmeer mahajani praises marathi director pravin tarde said he is best | “मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्यापेक्षा चांगलं...”, प्रवीण तरडेंबद्दल प्रश्न विचारताच गश्मीर महाजनीचं स्पष्ट उत्तर

“मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्यापेक्षा चांगलं...”, प्रवीण तरडेंबद्दल प्रश्न विचारताच गश्मीर महाजनीचं स्पष्ट उत्तर

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम हंक अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. अभिनयाबरोबरच गश्मीर त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. गश्मीर त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतो. त्याचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. गश्मीर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबद्दल गश्मीर सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देत असतो. फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याबरोबरच गश्मीर अनेकदा इन्स्टाग्रामवर askme सेशनही घेत असतो.

गश्मीरने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांबरोबर इन्स्टाग्रामवरील ask me सेशनमधून भाष्य केलं. या सेशनमध्ये त्याला मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडेंबद्दल एका चाहत्याने प्रश्न विचारला. “प्रवीण तरडेंबद्दल दोन शब्द काय सांगाल” असा प्रश्न चाहत्याने विचारला. यावर उत्तर देत गश्मीर म्हणाला, “ते बेस्ट आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत मला प्रोफोशनली त्याचपेक्षा चांगलं कोणीही ओळखत नाही.”

गश्मीरचे वडील रवींद्र महाजनी यांचं जुलै महिन्यात निधन झालं. ते कुटुंबीयांपासून दूर एकटेच राहत होते. बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळल्याने गश्मीर आणि महाजनी कुटुंबावर टीका होत होती. त्या कठीण काळात मराठी चित्रपटसृष्टीतील काही मोजके कलाकार गश्मीरच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. प्रवीण तरडेंनी कठीण काळात गश्मीरची मदत केल्याचं त्याने सांगितलं होतं.

दरम्यान, प्रवीण तरडेंच्या अनेक चित्रपटांत गश्मीर महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसला. ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव’ या प्रवीण तरडेंच्या चित्रपटात गश्मीरने महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’मध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे.

Web Title: gashmeer mahajani praises marathi director pravin tarde said he is best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.