फुल टू बिझी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 17:57 IST2016-09-13T12:27:32+5:302016-09-13T17:57:32+5:30
मंदार चोळकरने खूपच कमी वर्षात एक गीतकार म्हणून मराठी इंडस्ट्रीत आपले बस्तान बसवले आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांची आणि ...
.jpg)
फुल टू बिझी
म दार चोळकरने खूपच कमी वर्षात एक गीतकार म्हणून मराठी इंडस्ट्रीत आपले बस्तान बसवले आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांची आणि अनेक मालिकांची गीते लिहिली आहेत. या वर्षात त्याचे 11 चित्रपट प्रदर्शित झाले असून आणखी 3-4 चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहेत. तसेच त्याचे सध्या 15-20 चित्रपटांवर काम सुरू असून या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तो वाट पाहात आहे. मंदार सध्या त्याच्या कामात प्रचंड व्यग्र आहे. याविषयी मंदार सांगतो, गाणे लिहिणे हे मी काम नव्हे तर माझी आवड म्हणून करतो. त्यामुळे गेल्या वर्षांत माझे 15 चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि यंदादेखील या आकड्याच्या मी जवळपास पोहोचेन किंवा तो पार करेन याची मला खात्री आहे. हे वर्षं माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण या वर्षी माझ्या चित्रपटांचे अर्धशतक झाले आहे. 50 चित्रपटांमध्ये गाणी लिहिणे काही सोपे नाबी. पण काम करायला मी कधीच कंटाळत नाही. त्यामुळे भविष्यातही अनेक गाणी लिहिण्याचा माझा विचार आहे. आज माझ्याकडे इतके प्रोजेक्टस असूनही मी आणखी प्रोजेक्टसच्या प्रतीक्षेत आहे