'माझ्या बायकोचा प्रियकर'चं दुसरं पोस्टर आले समोर, तुम्ही पाहिले का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 13:03 IST2018-11-12T12:59:18+5:302018-11-12T13:03:37+5:30
‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील नुकतेच एक गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. २०१८ चे पहिले धम्माल गाण ‘तू हात नको लाऊ’ मुंबई मध्ये धूमधडाक्यात प्रदर्शित करण्यात आले.

'माझ्या बायकोचा प्रियकर'चं दुसरं पोस्टर आले समोर, तुम्ही पाहिले का?
राजकला मूवीज आणि बाबा मोशन पिक्चर्सच्या बॅनर खाली निर्मित मराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजीव एस. रूईया यांनी केलं आहे. चित्रपटाच्या नावातच कथा लपलेली आहे. विनोदी व कौटुंबिक पार्श्वभूमीवर कथा आधारित असल्यामुळे प्रेक्षकांचं धमाल मनोरंजन होऊ शकतं. नुकतंच या चित्रपटाचं दुसरं पोस्टर लाँच करण्यात आलं.
प्रियदर्शन व अनिकेतसोबत भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, भारत गणेशपुरे, स्वाती पानसरे, अंशुमन विचारे, पदम सिंह, अनुपम ताकमोघे, सुरेश पिल्लई यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची पटकथा अभिजित गाडगीळ तर संवाद संदीप दंडवते यांनी लिहिली आहे. दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा हे निर्माते आहेत. तर रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा हे सहनिर्माते आहेत. येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचे पेन मुव्हीज हे प्रस्तुतकर्ता आहेत.
‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मधील नुकतेच एक गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. २०१८ चे पहिले धम्माल गाण ‘तू हात नको लाऊ’ मुंबई मध्ये धूमधडाक्यात प्रदर्शित करण्यात आले. हे गाणं स्वरबद्ध केले आहे स्वाती शर्मा आणि नकाश अजीज यांनी, संगीत राजु सरदार यांचे आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. हे गाणे मीरा जोशी व मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार प्रियदर्शन जाधववर चित्रित करण्यात आले आहे. या दोघांची धमाल केमिस्ट्री आणि मीराच्या मनमोहक अदा यामुळे हे गाणे अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे.