/> पोस्टकार्ड, प्रियतमा, पोपट, झपाटलेला या मराठीचित्रपटांमध्ये कोरियोग्राफी केल्यानंतर आता ती हिंदी चित्रपटसृष्टी कडे वळाली आहे. लवकरच ती जुली २ या हिंदी चित्रपटामध्ये गणेश आचार्य समवेत साऊथ अॅक्टरेस राय लक्ष्मीला स्वत:च्या तालावर नाचवणार आहे. छोटा पडद्यावर डीआयडी सुपर मॉम, एकापेक्षा एक अप्सरा आली यांसारख्या रियालीटी शोज मध्ये काम करता करता ती थेट जुली२ या हिंदी चित्रपटांमध्ये कोरियोग्राफी करून, फुलवाने गरूड झेपच घेतली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जुली २ या चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक शीवदसानी करणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती संदीप नायर करणार आहेत. १९७५ साली आलेल्या जुली या चित्रपटाचा हा सिक्वेल असणार आहे. फुलवाचा हा वैयक्तीक पहिलाच हिंदी चित्रपट असल्यामुळे ती फार उत्साही व आनंदीत असल्याचे तीने सांगितले.