'बकेट लिस्ट' सिनेमाचं पहिलं गाणं आऊट, सोशल मीडियावर हिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 17:13 IST2018-05-09T11:38:53+5:302018-05-09T17:13:13+5:30
लवकरच संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणाऱ्या 'बकेट लिस्ट' या माधुरी दीक्षितच्या आगामी मराठी चित्रपटाचं 'होऊन जाऊ द्या!' हे पहिलं-वहिलं गाणं ...

'बकेट लिस्ट' सिनेमाचं पहिलं गाणं आऊट, सोशल मीडियावर हिट
ल करच संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणाऱ्या 'बकेट लिस्ट' या माधुरी दीक्षितच्या आगामी मराठी चित्रपटाचं 'होऊन जाऊ द्या!' हे पहिलं-वहिलं गाणं आज दिनांक 9 मे रोजी सोशल मीडियावर प्रसारीत झाले आहे.लाखो लोकांना आपल्या नृत्याने मोहून टाकणारी आपली मराठमोळी मोहिनी माधुरी दीक्षित पुन्हा एकदा 'बकेट लिस्ट' या आपल्या आगामी चित्रपटाच्या संपूर्ण कास्ट बरोबर नृत्याचा ठेका पकडत आपल्या सर्वांना त्यावर नाचायला लावण्यासाठी सज्ज झाली आहे.'बकेट लिस्ट' हा चित्रपट व्यक्तीच्या मनातील एका गूढ कोपऱ्यात असणाऱ्या ईच्छा, आकांक्षांना उजाळा देणारा असल्यामुळे त्यातील सर्वच गाणी देखील प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस येतील.'होऊन जाऊ द्या!' हे गाणं आपल्याला आयुष्य जगायला, जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायला व सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास प्रोत्साहीत करते आहे. ह्या गाण्याचं विशेष म्हणजे धकधक गर्ल माधुरी दीक्षितने स्वतः ह्या मराठी गाण्यावर नृत्याचा ताल धरलेला असून तिच्यासमवेत सुमित राघवन, वंदना गुप्ते, शुभा खोटे, प्रदीप वेलणकर, सुमेध मुडगलकर, दिलीप प्रभावळकर, इला भाटे, रेणुका शहाणे, कृतिका देव, मिलिंद पाठक, शालवा किंजवडेकर या 'बकेट लिस्ट' चित्रपटाच्या संपूर्ण टीमने तालात ताल मिसळलेला दिसून येतो आहे.श्रेया घोषाल, साधना सरगम आणि शान या सुराधिशांच्या स्वरांनी सजलेलं 'होऊन जाऊ द्या!' हे सूर मधुर गाणं रोहन-रोहन या संगीतकार जोड गोळीने संगीतबद्ध केलेलं आहे. तर मंदार चोळकर यांच्या लेखणीतून ते अवतरलं आहे.धर्मा, करण जोहर आणि ए ए फिल्म्स प्रस्तुत, दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित डार्क हॉर्स सिनेमाज्, दार मोशन पिक्चर्स आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित चित्रपट ‘बकेट लिस्ट’ येत्या 25 मे ला संपुर्ण जगभरात प्रदर्शित होणार असून मराठमोळ्या गाण्यावर माधुरीने धरलेला आपल्या नृत्याचा ताल सर्वांना घायाळ करेल यात काही शंकाच नाही.
Also Read:धकधक गर्ल माधुरी दीक्षित या कलाकारांना देते नृत्याचे धडे,पाहा PHOTO
Also Read:धकधक गर्ल माधुरी दीक्षित या कलाकारांना देते नृत्याचे धडे,पाहा PHOTO