करंटया चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 12:38 IST2017-02-20T07:08:36+5:302017-02-20T12:38:36+5:30

 सध्या मराठी चित्रपटसृष्टीत एकापाठोपाठ अनेक चित्रपट येत असतात. या सर्व चित्रपटाच्या कथा या विविध विषयावर भाष्य करत असल्याचे पाहायला ...

The first look of the film in Karantya | करंटया चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

करंटया चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

 
ध्या मराठी चित्रपटसृष्टीत एकापाठोपाठ अनेक चित्रपट येत असतात. या सर्व चित्रपटाच्या कथा या विविध विषयावर भाष्य करत असल्याचे पाहायला मिळत असतात. म्हणूनच या मराठी चित्रपटसृष्टीचे विशेष कौतुक जगभरात केले जाते. इतकेच नाही तर, आता मराठी चित्रपटांचे रिमेकदेखील होत असल्याचे पाहायला मिळते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे सैराट. जगभरात कौतुकास्पद ठरलेला या चित्रपटाचा रिमेक आता कन्नड आणि बॉलिवुडमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणूनच मराठी चित्रपटसृष्टी ही यशाच्या शिखरावर पोहोचली असल्याची ही पावती आहे. आता अशा या मराठी चित्रपटांच्या गर्दीत आणखी एक आगामी चित्रपट प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. 
   
      करंटया असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच सोशलमीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा हा फर्स्ट लूक म्हणजेच पोस्टर झक्कास असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या या फर्स्ट लूकला सोशलमीडियावर प्रचंड प्रमाणात पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटाची टॅगलाईन मला शिक्षक व्हायचं होतं पण.. अशी आहे. या चित्रपटाच्या टॅगलाइनवरून शिक्षकांवर भाष्य करणारा हा चित्रपट असेल असा अंदाज बांधता येतो. मात्र नक्की हा चित्रपट काय असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. एके फिल्म्स आणि स्वप्नपूर्ती फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत करंटया हा चित्रपट आहे. चित्रपटांच्या प्रमोशन फंडयानुसार या चित्रपटातील कलाकार कोण असणार आहे हेदेखील अदयाप गुलदस्त्यात आहे. तसेच चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मातेचे नावदेखील सांगण्यात आले नाही. 



Web Title: The first look of the film in Karantya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.