'सैराट' फेम तानाजी गळगुंडेच्या बाळाची पहिली झलक समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:57 IST2025-10-09T18:56:55+5:302025-10-09T18:57:19+5:30
'सैराट' (Sairat Movie) चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता तानाजी गळगुंडे (Tanaji Galgunde) सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

'सैराट' फेम तानाजी गळगुंडेच्या बाळाची पहिली झलक समोर
'सैराट' (Sairat Movie) चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता तानाजी गळगुंडे (Tanaji Galgunde) सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. चित्रपटात 'लंगड्या'ची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवलेल्या तानाजीच्या घरी काही दिवसांपूर्वी बाळाचं आगमन झालं होतं. त्याची पत्नी प्रतीक्षा शेट्टीने अलिकडेच बाळाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली.
प्रोफेशनल लाइफसोबतच तानाजी त्याच्या खासगी आयुष्यातील निर्णयामुळेही चर्चेत असतो. त्याने काही महिन्यांपूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल खुलासा केला होता आणि तो तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याची माहिती दिली होती. त्याने लग्न केल्याचंही लपवून ठेवलं होतं. त्यानंतर त्याची बायको प्रतीक्षा शेट्टीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बेबी शॉवरचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर प्रतीक्षाने तिच्या मुलाची झलक सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीवर दाखवली.
तानाजी गळगुंडेची गर्लफ्रेंड प्रतीक्षा शेट्टी एक मॉडेल आणि उद्योजिका आहे. त्याच्या ऑपरेशनच्या काळात तिने त्याची विशेष काळजी घेतली होती. प्रतीक्षा वेगळ्या जातीमधली असल्यामुळे सुरुवातीला तानाजीच्या आईने त्यांच्या नात्याला विरोध केला होता. मात्र, कालांतराने तानाजीने आपल्या आईला समजावून सांगितल्यानंतर त्यांनी त्यांचे नाते स्वीकारले होते.
वर्कफ्रंट
तानाजी गळगुंडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नागराज मंजुळे यांनी त्याला सैराट या सिनेमात एक संधी दिली अन् त्यानं या संधीचं सोन केलं . या चित्रपटातून तो घराघरात पोहोचला. यानंतर त्याने काही मालिका सिनेमा काम केले.