'बर्नी' चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 15:52 IST2016-05-28T10:22:36+5:302016-05-28T15:52:36+5:30

शिवलीला फिल्म् प्रस्तुत आणि शिवम लोणारी निर्मित 'बर्नी' चित्रपटाचे दिग्दर्शन निलीमा लोणारी यांनी केले आहे.  प्रा. सुभाष भेंडे यांच्या ...

Finished music preview of 'Bernie' | 'बर्नी' चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न

'बर्नी' चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न

वलीला फिल्म् प्रस्तुत आणि शिवम लोणारी निर्मित 'बर्नी' चित्रपटाचे दिग्दर्शन निलीमा लोणारी यांनी केले आहे.  प्रा. सुभाष भेंडे यांच्या 'जोगीण' या कादंबरीवरून 'बर्नी' हा चित्रपट प्रेरित झाला आहे. पटकथा नीलिमा लोणारी यांनी लिहिली असून संवाद सचिन दरेकर यांचे आहेत. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी 'बर्नी' च्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

नुकताच मुंबई येथे या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी  तेजस्वीनी लोणारी, नीलकांती पाटेकर, राजन ताम्हाणे, भूषण पाटील, गिरीश परदेशी, सविता मालपेकर, किरण खोजे, सुमुखी पेंडसे, मौसमी तोंडवळकर, चैत्राली डोंगरे, दिग्दर्शन निलीमा लोणारी, संगीत दिग्दर्शक अमितराज, गायिका वैशाली सामंत आदी कलाकार उपस्थित होते.

या चित्रपटात गोव्याचे सौंदर्य दाखवण्यात तर आलेच आहे पण त्यासोबत नीलिमा लोणारी  एक आगळा वेगळा विषय घेऊन येत आहे. बर्नी  येत्या १७ जून रोजी प्रदर्शित होत आहे. 

Web Title: Finished music preview of 'Bernie'